Manapman Muhurta: सुबोध भावेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा; शूटिंगलाही सुरुवात

Subodh Bhave New Movie: २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित या सिनेमाचे जोरदार कौतुक होत आहे. (Social media) तसेच या सिनेमामधील हटके गाणे देखील ऐकायला आणि पाहायला मिळत असतात. गेल्या वर्षी सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमाला ७ वर्ष पूर्ण झाली. […]

Subodh Bhave New Movie

Subodh Bhave New Movie

Subodh Bhave New Movie: २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित या सिनेमाचे जोरदार कौतुक होत आहे. (Social media) तसेच या सिनेमामधील हटके गाणे देखील ऐकायला आणि पाहायला मिळत असतात. गेल्या वर्षी सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमाला ७ वर्ष पूर्ण झाली.


सुबोध भावेने गेल्या वर्षी या सिनेमाची घोषणा केली होती. त्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांना मोठा आनंद झाला होता. नुकताच त्यांनी त्याच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त पार पडला असून सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.


सर्वात अगोदर ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मी वसंतराव’नंतर आणखी एक नवा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. सुबोधच्या आगामी सिनेमाचं नाव ‘मानापमान’ असं आहे. नुकताच ‘मानापमान’ या सिनेमाचा मुहूर्त पुण्यातल्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इंस्टीट्यूटच्या कॅम्पसमध्ये कार्यक्रम पार बसले आहे. त्या कार्यक्रमाचे फोटो सुबोधने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे.

सुबोधने शेअर केलेल्या फोटोत आणि व्हिडीओमध्ये आणखी एक चाहत्यांसाठी सांगितीक मैफल येणार असल्याचे यावेळी त्याने सांगितले आहे. नुकतीच शूटिंगला सुरुवात झाली असून चाहत्यांना सुबोधच्या आगामी सिनेमाबद्दल मोठी  उत्सुकता लागली आहे. अभिनेत्याने शेअर करत असताना कॅप्शन देखील दिले आहे की, “कट्यार नंतर पुन्हा एखादी संगीतमय कलाकृती सादर करावी, अशी आम्हा सर्व टीमची ईच्छा होती. आणि अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.

Tamanna Bhatia कडून महिला आरक्षणाचं कौतुक; संसदेला देखील दिली भेट

आज आम्ही जियो स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अ‍ॅण्ड फिल्म्स निर्मित कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘संगीत मानापमान’ या नाटकावरून प्रेरित असलेल्या, ‘मानापमान’ या आगामी संगीतमय सिनेमाचा मुहूर्त पुण्यामधील FTII च्या पवित्र जागेत करण्यात आला आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद कायम असूदे, मोरया….” सोबतच सुबोधने स्वतःचा एक व्हिडीओ देखील शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत तो सिनेमासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

सध्या या सिनेमातली स्टारकास्ट जाहीर झाली नाही. सिनेमामध्ये नेमकं कोणकोण असणार आहे, याबद्दल सर्वांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. अभिनेत्याची पोस्ट बघून फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटी आणि मित्रांनी देखील त्याला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा देत असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version