Tamanna Bhatia कडून महिला आरक्षणाचं कौतुक; संसदेला देखील दिली भेट

Tamanna Bhatia कडून महिला आरक्षणाचं कौतुक; संसदेला देखील दिली भेट

Tamanna Bhatia : महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन'(Women’s Reservation) लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. राज्यसभेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जून मेघवाल(Arjun Meghwal) यांनी मांडलं असून त्यावर राज्यसभेच्या खासदारांमध्ये चर्चासत्र सुरु आहे.

लोकसभेत हे विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे, मात्र, राज्यसभेत अद्याप मंजूर होणं बाकी आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिकक असल्याचं बोललं जात आहे. त्यावर आता अभिनेत्री तमन्ना भाटीयाने (Tamanna Bhatia) देखील महिला आरक्षणाचं कौतुक करत संसदेला देखील भेट दिली.

India Canada Row मुळं महागाई वाढणार; सर्वसामान्यांच्या किचनचं बजेट बिघडणार?

तमन्ना भाटीयाकडून महिला आरक्षणाचं कौतुक!

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला नुकतीच मंजुरी मिळाली आणि भारतातील प्रसिद्ध अभिनेत्रींसह विविध क्षेत्रातील महिलांनी याच कौतुक केलं. यामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने देखील या विधेयकाच कौतुक केलं आणि दिल्लीत असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीला तिने भेट दिली. तमन्ना हिने ये विधेयकाचे कौतुक केले आणि ते एक महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचं व्यक्त केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ती म्हणाली, ‘हे विधेयक सर्वसामान्यांना राजकारणात येण्यासाठी प्रेरित करेल.’

Radhakrishn Vikhe : संजय राऊत सर्वात मोठा दलाल; मंत्री विखेंची कडव्या शब्दांत टीका

दरम्यान तमन्ना भाटिया नुकतीच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटामध्ये दिसली होती. त्यामध्ये तिच्या गाण्याने आणि डन्सने प्रेक्षकांना भूरळ घातली. त्यानंतर तिचे आगामी प्रोजेक्ट्स देखील चाहत्यांची उत्सुकता वाढणारे आहेत. ती मल्याळम चित्रपट ‘बांद्रा’, तामिळ चित्रपट ‘अरनामनाई 4,’ आणि हिंदी उपक्रम ‘वेदा,’ मध्ये दिसणार आहे. ज्यात ती जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे. याव्यतिरिक्त, हॉटस्टारवरील तिच्या ‘आखरी सच’ या शोला खूप कौतुक मिळतंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube