Download App

याला सावजी आणि तांबडा-पांढरा रस्सा पाजा; वरण-भाताला गरिबांचं अन्न म्हणणाऱ्या अग्निहोत्रीवर भडकली अभिनेत्री

Vivek Agnihotri यांनी मराठी जेवण म्हणजे गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं जेवण म्हटल्याने अभिनेत्री नेहा शितोळेने संतप्त प्रतिक्रिया दिली

Marathi Actress Criticize Vivek Agnihotri on his Statement about Varan Bhat and Maharashtriyan Food : ‘द काश्मीर फाईल्स’ फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या सिनेमांमुळे तर कधी त्यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे. अशातच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवण म्हणजे गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं जेवण असल्याचं म्हटलं आहे. यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. त्यातच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री नेहा शितोळेने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांच्या या व्यक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत तिने लांबलचक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

नेहाने पोस्टमध्ये काय म्हटलंय?

नेहाने पोस्टमध्ये म्हटंलय की, “मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृतीविषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस… पुढे अजुन एका रीलमध्ये हा म्हणतोय की, मी सात्विक अन्न खातो… (याला सावजी खायला घाला आणि एकदा तांबडा-पांढरा रस्सा पाजा.) ‘गरिबांचं’ किंवा ‘किसानांचं’ जेवण म्हणजे वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताच्या जवळजवळ 25% जनतेचा, जी दारिद्र्य रेषेखाली राहतात; त्यांचा अपमान करतो आहे.”

..तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचं पद जाणार; केंद्र सरकार आज लोकसभेत महत्वाचं विधेयक मांडणार

पुढे नेहा म्हणते, “आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगते आहे आणि मुळात आम्ही भाज्या फक्त उकडत नाही, उकडीचे मोदक सोपे नाहीत किंवा पुरणपोळीही सोपी नाही. ज्यांच्या घरी असं जेवण जेवतात, अश्या मुलीशी कसं लग्न करायचं? हा विवेक अग्निहोत्रीला पडलेला प्रश्न आहे आणि हे सगळं युट्यूबच्या माध्यमातून करोडो लोक बघत आहेत.”

संकट आलंय कुणी मुद्दाम केलं का? मोनोरेलच्या मुद्द्यावरून अजित पवार संतापले

नेहाने पोस्टद्वारे उपस्थित केले प्रश्न

पोस्टमध्ये तिने काही सवालही उपस्थित केले आहेत. ती म्हणते, “हा माणूस काश्मीरचं सत्य आपल्या समोर आणतो आहे; म्हणून आपण याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल मनात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत, तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी याचे सिनेमे बॉयकॉट करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना ‘धडा शिकवण्याचा’ आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची ग्वाहीही दिली. तसं आता यांना ‘वरण भाताची’ किंमत आणि महत्त्व कोण शिकवणार?”

मोठी बातमी! जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात गुन्हा दाखल; आरोपीमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचारी

अशा लोकांमुळे मराठी संस्कृतीला धोका

यानंतर नेहाने पोस्टमध्ये लिहिलंय, “या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे. कारण हे पॉवर पोझिशनमध्ये बसून मराठी लोकांविषयी, भाषेविषयी वाईट, निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य करतात. त्यामुळे नाही म्हणलं तरी अनेक स्तरांवर लोकांच्या मनात कळत-नकळत परिणाम होतो आणि आपण चित्रपटगृहं मिळत नाही, मराठी अनिवार्य नाही, मराठी कंटेंट ओटीटी स्वीकारत नाही इत्यादी गोष्टीसाठी भांडत बसतो.”

मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, हल्लेखोराने चापट मारल्याचीही माहिती

शेवटी नेहा म्हणते की, “आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची भीती वाटते का? त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का?” अशी खदखदही व्यक्त करते. दरम्यान, नेहाने शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी समर्थन दिलं आहे. तिची ही भूमिका योग्य असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

follow us