Prachi Pisat Allegation On Sudesh Mhashilkar Sending Obscene Messages : मराठी टेलिव्हिजनवरील (Marathi Actress) अभिनेत्री प्राची पिसाट (Prachi Pisat) हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही घडलेली घटना सांगितलेली आहे. तिला एका अभिनेत्याने फेसबूक मेसेंजरवर एक (Entertainment News) मेसेज केला. या मेसेजमध्ये म्हटलंय की, ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव’ अशी स्पष्ट मागणीच केल्याचं (Sudesh Mhashilkar) स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे.
अभिनेत्री प्राची पिसाटने या चॅटचा स्कीनशॉट फेसबूकवर शेअर केला असून संताप देखील व्यक्त केलाय. प्राची पिसाटने झी मराठीवरील ‘तू चाल पुढे’ या मालिकेत ‘तारा’ भूमिका साकारली होती. परंतु या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्राची पिसाटने ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या फेसबुक मेसेजचा स्क्रीन शॉट शेअर केलाय. त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सोशल मीडियावर प्राची खूप सक्रीय असते. नेहमीच ती तिच्या आवडीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर देखील करते. अशातच आता पुन्हा एकदा प्राची चर्चेत आलीय.
तर सुदेश म्हशीलकर मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते आहे. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेमध्ये काम करत असल्याचं कळतंय.
प्राची पिसाटने सुदेश यांच्या फेसबुक मेसेजचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्क्रीन शॉटमध्ये दिसतंय की, ‘तुझा नंबर पाठव ना…तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये…कसली गोड दिसतेस’ असा मेसेज सुदेश यांनी प्राची पिसाटला केला आहे. यावर प्राचीने म्हटलंय की, हो…आहे मी गोड. चला आता विषय संपवुया @sudeshmhashilkar. तुमची माफी मागायची इच्छा नसेलच, आम्ही तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्से सांगु शकते.
प्राचीने हा स्क्रीन शॉट शेअर करत म्हटलंय की, मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असलेच, ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का. ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच’ असं देखील प्राचीन म्हटलंय. मात्र चाहत्यांनी सुदेश यांच्यावर विश्वास दाखवला आहे, त्यांचं अकाउंट हॅक झाल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.