Ahmednagar News: लोकसभा! नगरमध्ये ‘रामराज्य’ येणार…; निवडणुकांआधी शिंदे यांचं मोठं विधान

Ahmednagar News: लोकसभा! नगरमध्ये ‘रामराज्य’ येणार…; निवडणुकांआधी शिंदे यांचं मोठं विधान

Ahmednagar News: राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने विकासकामांच्या माध्यमातून नेतेमंडळी एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहे. राज्यात युती झाल्यानंतर महायुती झाली व आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) व राम शिंदे (Ram Shinde) यांची जोडी झळकू लागली. यावर बोलताना शिंदे म्हणाले. आम्ही दोघे एकत्र आलो कि चर्चा होणारच कारण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आमचे पक्ष जरी भिन्न असले तरी मत आम्ही सरकारमध्ये एकच आहोत तसेच सरकार येण्या अगोदर देखील आमचे वैयक्तिक संपर्क असल्याने आम्ही एकत्र होतो. तसेच एकत्र आलो कि चर्चा झालीच पाहिजे असा मिश्किल टोला, यावेळी आमदार राम शिंदे यांनी लगावला.

पारनेरमधील (Parner) पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान येथील यात्रौत्सवानिमित्त पारनेरचे आमदार निलेश लंके व भाजपचे विधानपरिषदेचे आमदार निलेश लंके हे एकत्र भेटले. यावेळी दोघांनी एकाच वाहनातून देखील प्रवास केला. दरम्यान शिंदे व लंके हे जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा या रंगल्या आहेत. दरम्यान मंदिर विकासकामाच्या माध्यमातून हि जोडी पुन्हा एकत्र आली होती. यावेळी शिंदे यांनी राजकीय या भेटीवर भाष्य केले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा येथे आम्ही देवस्थानाला भेट देत याठिकाणी आरती केली. तसेच याभेटीवर बोलताना ते म्हणाले, राज्यात युती झाल्यानंतर महायुती झाली. आम्ही दोघे एकत्र आलो कि चर्चा होणारच कारण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आमचे पक्ष जरी भिन्न असले तरी मत आम्ही सरकारमध्ये एकच आहोत, तसेच सरकार येण्या अगोदर देखील आमचे वैयक्तिक संपर्क असल्याने आम्ही एकत्र होतो. तसेच एकत्र आलो कि चर्चा झालीच पाहिजे. असे निवडणुकांआधीचं शिंदे यांनी मोठं विधान केले आहे.

बॉबी देओलने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

नगरमध्ये ‘रामराज्य’ येणार: आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार आहे. त्यानुषंगाने आमदार राम शिंदे हे देखील तयारीला लागले आहे. नुकतेच लंके यांच्या भेटीदरम्यान ते म्हणाले, देशात आता रामाची प्रतिष्ठापना झाली आहे. देशात रामराज्य आले आहे. नगर जिल्ह्यात देखील रामराज्य येणार आहे. संपूर्ण देशाच्या लोकसभेमध्ये रामराज्याची लहर आहे त्यामुळे नगर जिल्ह्यात देखील रामराज्य येणार असं सूचक वक्तव्य आमदार राम शिंदे यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज