तरुणाईच्या मस्तीचा ठेका धरायला लावणारं ‘मांजर’चं ‘मराठी ब्युटी’ गाणं प्रदर्शित!

पार्टीचा माहोल, भन्नाट एनर्जी आणि बिनधास्त अंदाज यामुळे ‘मराठी ब्युटी’ हे गाणं संगीतप्रेमींना ठेका धरायला लावणारं ठरणार आहे.

Untitled Design   2026 08 29T102217.601

Untitled Design 2026 08 29T102217.601

‘Marathi Beauty’ song released! : चार मित्रांच्या धमाल विश्वाची झलक दाखवणाऱ्या ‘मांजर’ या चित्रपटातील ‘मराठी ब्युटी’ हे भन्नाट पार्टी साँग नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. धमाकेदार बीट्स, एनर्जेटिक डान्स आणि मस्तीने भरलेलं हे गाणं सध्या चांगलंच लक्ष वेधून घेत आहे. पार्टीचा माहोल, भन्नाट एनर्जी आणि बिनधास्त अंदाज यामुळे ‘मराठी ब्युटी’ हे गाणं संगीतप्रेमींना ठेका धरायला लावणारं ठरणार आहे.

गाण्यातील कलाकारांची जबरदस्त एनर्जी आणि डान्समधून दिसणारी धमाल यामुळे या गाण्याची रंगत आणखी वाढली आहे. हे गाणं सिद्धार्थ मेनन आणि वैष्णवी आंधळे यांच्यावर चित्रीत करण्यात आले असून या गाण्यातून मराठी मुलीचं सौंदर्य आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण अधोरेखित करण्यात आलं आहे. तिचे सौंदर्य पाहून सिद्धार्थ मेननच्या व्यक्तिरेखेकडून व्यक्त होणारं कौतुक आणि त्याभोवती रंगणारा पार्टीचा माहोल गाण्याला एक वेगळीच मजा देतो. एनर्जेटिक संगीत, भन्नाट डान्स आणि पार्टी मूड यामुळे ‘मराठी ब्युटी’ तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये आपली जागा निर्माण करणारं ठरणार आहे.

‘मराठी ब्युटी’ या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. रोहन प्रधान यांनी आपल्या दमदार आवाजात गाणं गायलं असून प्रशांत मडपुवार यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. जोशपूर्ण संगीत, भन्नाट शब्द आणि कलाकारांच्या एनर्जेटिक सादरीकरणाचा मेळ या गाण्यात पाहायला मिळतो.

कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र द्या, आजपासून मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत उपोषण

या गाण्याबद्दल दिग्दर्शक सुशील महादेव म्हणतात, ”आजच्या तरुणाईला पार्टी, मस्ती आणि एन्जॉयमेंटचा मूड खूप आवडतो. ‘मराठी ब्युटी’ हे गाणं त्याच धमाल वातावरणातून साकारलं आहे. गाण्यात सिद्धार्थ मेननची व्यक्तिरेखा एका मराठी मुलीच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसते. तिचं सौंदर्य, गाण्याचा एनर्जेटिक अंदाज आणि त्याला मिळालेली धमाकेदार संगीताची साथ यामुळे ‘मराठी ब्युटी’ला एक वेगळीच रंगत आली आहे. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच एन्जॉय करायला लावेल आणि त्यांना ठेका धरायला भाग पाडेल.”

एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्यासह सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या वितरणाची धुरा एए फिल्म्सने सांभाळली आहे. येत्या 18 सप्टेंबर 2026 रोजी ‘मांजर’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version