Download App

Marathi Directors : एका फ्रेममध्ये दिसले मराठमोळे दिग्दर्शक ! भेटीमागे नेमके खास कारण काय?

Marathi Directors : ओम राऊतच्या पुढाकारने बॉलीवूड गाजवणाऱ्या मराठी दिग्दर्शकांनी आदित्य सरपोतदारची पाठ थोपटली आहे.

Marathi Directors Success Together: बॉक्स ऑफिसवर (Box Office) ‘मुंज्या’ सिनेमाचा (Munjya Movie) सध्या बोलबाला पाहायला मिळत आहे. या सिनेमाने बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या सिनेमांना मागे टाकले आहे. त्यात मराठी सिनेसृष्टीसाठी महत्वाचा विषय म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने (Aditya Sarpotdar) केलं आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या सिनेमांची धुरा मराठी दिग्दर्शकांनी पेलली आहेत. त्यातच आता कौतुकाची बाब म्हणजेच या सगळ्या दिग्दर्शकांनी एकत्र येत गेट टू गेदर केले आहे.


बॉलीवूड गाजवणाऱ्या मराठी दिग्दर्शकांनी सत्य प्रेम की कथा, रामायण, मुंज्या यांसारखे हटके सिनेमे असो किंवा पाताल लोक, ताली यांसारख्या गाजलेल्या वेब सिरिज असो. या सगळ्यांच्या दिग्दर्शनाची धुरा ही मराठी माणसांनी सांभाळली आहे. मात्र अनेकदा मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो, असे अनेकांचे मत आहे.

पण हाच मराठी माणूस जेव्हा पुढे जात असतो, त्यावेळेस चार मराठी माणसं एकत्र मिळून त्याचं तोंडभरून कौतुक देखील करत असतात, हे या दिग्दर्शकांनी दाखवून दिले आहे. बॉलीवूडवर अधिराज्य गाजवाणाऱ्या या मराठी दिग्दर्शकांचं नुकतच गेट टू गेदर साजरा केल्याचे पाहायला मिळाले आहे. आणि आदित्य सरपोतदारला मिळालेलं मोठं यश. याबद्दल दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Bhaskar Jadhav : राणे, शिंदेंची मिमिक्री अन् रामदास कदमांना बामलाव्या का म्हणतात? भास्कर जाधवांनी सांगून टाकलं

रवी जाधव यांची पोस्ट काय?

रवी जाधव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अविनाश अरुण, आदित्य सरपोतदार, समीर विद्वंस, निपुण धर्माधिकारी, लक्ष्मण उतेकर, ओम राऊत, निखिल महाजन, राजेश म्हापुसरकर,तेजस,देऊस्कर, ज्ञानेश झोटिंग, जयप्राद देसाई, रवी जाधव ही मंडळी दिसत आहे. या सगळ्यांनीच बॉलीवूडमध्ये तोडीस तोड काम केलं आहे. या फोटोला कॅप्शन देत रवी जाधव यांनी म्हटलं की, काल मराठी सिनेमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि आता हिंदी चित्रपट, वेब सिरीजमध्येही उत्तम कामगिरी करणाऱ्या मराठी दिग्दर्शकांनी एकत्र येऊन आदित्य सरपोतदार यांचे त्यांच्या तुफान हिट चित्रपट ‘मुंज्या’साठी अभिनंदन केले. युनायटेड कलर्स ऑफ मराठी डिरेक्टर्स’ ची ही केवळ सुरूवात आहे! ओम राऊत धन्यवाद या initiative साठी. नागराज मिस यू.

follow us

वेब स्टोरीज