Film Awards Ceremony 2025 : वरळीतील एनएससीआय डोममध्ये हीरक महोत्सवी (Awards) राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह 60 आणि 61 वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मी पुन्हा येईनचा डायलॉग चोरला असं म्हणत फडणवीसांनी अभिनेते अनुपम खेर यांचा कोपरखळी मारली.
कॉपीराईट माझ्याकडे
अनुमप खेर यांना आपण पुरस्कार दिला. त्याच्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. अतिशय सुंदरपणे ते भूमिका साकारत असतात. हास्यकलाकाराची भूमिका असेल किंवा संवेदनशील भूमिका असेल त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका सुंदरपणे साकारल्या आहेत. पण, आज त्यांनी माझा एक डायलॉग चोरलेला आहे. ते म्हणाले मी पुन्हा येईन… याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे. तो कॉपीराईट मी त्यांना द्यायला तयार आहे. मला विश्वास आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पुन्हा या मंचावर दिसतील असंही ते म्हणाले.
Video : मोठी बातमी, राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राडा
मुक्ता बर्वे अतिशय गुणी अभिनेत्री आहे. नाटक आणि सिनेमातून तिने 360 डिग्री प्रमाणे त्यांनी काम केलं. विशेषत: त्यांचा चारचौघींमधील मोनोलॉग अप्रतिम आहे. त्यांचाही आपल्याला सत्कार करण्यात आला. महेश मांजरेकर सरांचा ‘आवाजही काफी है, ते त्यांच्या आवाजाने घायाळ करु शकतात. उत्तम कलावंत आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी आपल्याला अप्रतिम सिनेमे दिलं. त्यांचा गौरव करण्याची संधी मिळाली, यासाठी आम्ही स्वत:ला धन्य समजतो असंही ते म्हणाले.
भाषणावेळी घोषणाबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी गोंधळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार खालिद का शिवाजी सिनेमाला विरोध करत अज्ञाताने घोषणाबाजी केली असल्याची माहिती समोर येत आहे. इतिहासाचं विकृतीकरण बंद करा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.