Video : मोठी बातमी, राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राडा

Marathi Film Awards Ceremony : 60 आणि 61 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी गोंधळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार खालिद का शिवाजी (Khalid ka Shivaji) सिनेमाला विरोध करत अज्ञाताने घोषणाबाजी केली असल्याची माहिती समोर येत आहे. इतिहासाचं विकृतीकरण बंद करा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
यानंतर कार्यक्रम खराब करू नका तुमचं म्हणण ऐकलं असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. आता त्यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी असं माध्यमांशी बोलताना आंदोलकांनी सांगितले.
तसेच इतिहासाचं विकृतीकरण करण्यात येत आहे. रायगडमध्ये मशीद नसताना ते देखील मशीद असल्याचा सांगितला जात आहे असा दावा देखील माध्यमांशी बोलताना आंदोलकांनी केला. याच बरोबर खालिद का शिवाजी या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
नेमकं प्रकरण काय?
60 आणि 61 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाची सुरुवात करत असताना बॅनर दाखवत इतिहासाचां विकृतीकरण बंद करा अश्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आले. तसेच खालिद का शिवाजी या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी इतिहासात नसल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आला. इतिहासात नसणाऱ्या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात येत असल्याने या चित्रपटावर बंदी आणा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम खराब करू नका तुमचं म्हणण ऐकलं असं म्हणत भाषणाला सुरुवात केली.
ढगफुटी म्हणजे काय, डोंगराळ भागात इतके ढग का फुटतात? जाणून घ्या सर्वकाही
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही आंदोलकांना पोलिसानी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्यांना वरळी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.