आम्ही कायम कलाकारांच्या पाठिशी; चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द

Film Awards Ceremony 2025 : आज या कलाकारांचा सत्कार करताना अभिमान वाटतो. (Film) कारण, हा त्यांचा सन्मान नसून राज्याचाच सन्मान होतोय असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरास्कारार्थी कलाकारांचा सन्मान केला. ते महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गझलकार, भिमरावर पंचाळ, अभिनेत्री मुक्ता बर्वे, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांचा सन्मान करण्यात आला.
मराठी आणि मराठी कलाकार आपला सगळ्यांचा अभिमान आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीसारख दुसर थेटर नाही असं म्हणत सध्याच्या काळात कलाकार जे काम करतात ते गौरवास्पद आहे असंही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आम्ही सर्व कलाकारांसोबत आहेत. तुम्ही कोणत्याही काळात सांगा आम्ही आपल्यासोबत आहोत असंही ते म्हणाले.
‘वॉर 2’ ची धमाकेदार सुरुवात! ऋतिकच्या घरासमोर एनटीआरचं आव्हान
अमरावती जिल्ह्याने आपल्याला दोन हिरे दिले आहेत. एक भीमराव पांचाळे आणि दुसरे म्हणजे सुरेश भट… गझलकार भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी गेली 50 वर्ष सर्वांवर मोहिनी घातली आहे. या जोडीने गझलांना वेगळी उंची दिली. मराठीतील गझलांमध्ये भीमराव पांचाळे आणि सुरेश भट यांचा कोई मुकाबला नही.. कित्येक देशांमध्ये त्यांनी गझला नेल्या. वर्ध्याच्या स्मशानातही त्यांनी कार्यक्रम केला. त्यांचा आपण गौरव करु शकलो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव पांचाळे यांचं कौतुक केलं.
कोणाला कोणता पुरस्कार? संपूर्ण यादी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार – भीमराव पांचाळे
चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार (2024) – प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर
चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री मुक्ता बर्वे
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार (2024) – ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री काजोल