Marathi Film Man pishachch 80-minute movie in just Rs 33 thousands by Director Rahi Barve : राही अनिल बर्वे या प्रयोगशील दिग्दर्शकाने केवळ 33 हजार रुपयात 80 मिनिटाचा सिनेमा “मन – पिशाच्च” बनवला ही फिल्म जगभरातील फिल्ममेकर्स आणि निर्मात्यांसाठी एक नवा प्रयोग आहे. घरच्या पीसीचा वापर करून साठ पानांची स्क्रिप्ट काही अनिल बर्वे यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे.
अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेल्यांना दिलासा! सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांची महत्त्वाची घोषणा
जिथे कोट्यवधींची उड्डाणे घेत असलेला आणि बीएफ एक्स स्पेशली इफेक्ट आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आधुनिक होत असलेल्या बिग बजेट मॅग्नम ओपस फिल्म्स समोर कंटेंटला तितकच महत्त्व देऊन आपल्या गोष्टीवर विश्वास ठेवून अवघ्या 33 हजार रुपयात हा सिनेमा केला आहे.
स्वतः हाताने तयार केलेला स्टोरी बोर्ड, फोटोशॉप, जनरेटिव्ह एआय, टूल्स आणि आफ्टर इफेक्ट्स चा वापर करून हा सिनेमा करण्यात आला आहे. या सिनेमात दीपक दामले आणि यानीना भारद्वाज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आपलं व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी या गोष्टीच्या जोरावर हा 4k मध्ये हा सिनेमा बनविण्यात आला आहे.त्यामुळे येत्या कालावधीत माझ्याकडे उत्तम स्क्रिप्ट आहे पण निर्मात्यांनी विश्वास दाखवला नाही असं क्रिएटिव्ह फिल्म म्हणता येणार नाही आता अत्यंत अल्प बजेटमध्येही आपण आपला सिनेमा करू शकतो याचं जिवंत उदाहरण राहील बर्वे यांनी दाखवून दिले आहे.
