Download App

बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यास ‘ये रे ये रे पैसा 3’ सज्ज; मुंबईत शुटींग सुरू

Marathi Film ये रे ये रे पैसा च्या दोन्ही भागांनी प्रचंड धुमाकुळ घातल्यानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Marathi Film Ye Re Ye Re Paisa 3 Shooting Start : ये रे ये रे पैसा (Ye Re Ye Re Paisa) या चित्रपटाच्या (Marathi Film) दोन्ही भागांनी प्रेक्षकांना भूरळ घालत बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकुळ घातला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या चित्रपटाचं मुंबईमध्ये शुटींग सुरू (Shooting Start) झालं आहे.

विरोधकांकडे संधी असूनही…, जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर सरकार पुढे मुद्दे मांडत चव्हाणांचा विरोधकांना टोला

ये रे ये रे पैसा आणि ये रे ये रे पैसा २ या चित्रपटांनी यापूर्वी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं होतं. पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथासूत्रावर हे चित्रपट बेतलेले होते. आता आधीच्या दोन चित्रपटांतलं कथानक आणि त्या धमाल व्यक्तिरेखा आता तिसऱ्या भागात काय धमाल करणार याची उत्सुकता चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच निर्माण झाली आहे.

घटस्फोटित मुस्लीम महिलांनाही पोटगीचा अधिकार : सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते/दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणला मुंबई येथे सुरुवात झाली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य मंडळी उपस्थित होती. पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक, दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देणार आहे.

Maratha OBC Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

नुकतेच सुप्रसिद्ध  गायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजातील एक गाणेही रेकॉर्ड करण्यात आले होते. संजय जाधव यांचं दिग्दर्शन, अरविंद जगताप यांचे खुसखुशीत संवाद, दिग्गज अभिनेत्यांचा अभिनय आणि मनोरंजक कथानकाची पर्वणी या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो  या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून,  निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर,  ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे  निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत . चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटातुन भेटीस येणार आहे. तर या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे.   

follow us