Download App

Actor Bharat Thakur: ‘क्लब 52’ सिनेमातील अभिनेता भरत ठाकूरचा खडतर प्रवास!

Actor Bharat Thakur: एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या ‘क्लब 52’ (Club 52) या मराठी सिनेमातील (Marathi Movie) अभिनेता भरत ठाकूरनं या टॅगलाइनचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. (Social media) ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून सुरुवात करून मुख्य भूमिकेपर्यंतचा प्रवास भरतनं केला आहे. ‘क्लब 52’ हा मराठी सिनेमा १५ डिसेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे.


नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘क्लब 52’ या मराठी सिनेमाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

सिनेमात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे. अभिनय करण्याव्यतिरिक्त मनोरंजन क्षेत्राविषयी मला काहीच माहिती नव्हती. एका मित्रानं मला ज्युनिअर आर्टिस्टच्या जगात नेलं. त्यानंतर ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून दोन- तीन वर्षं काम केलं.

Shyamchi Aai: प्रत्येक आई अशीच असते का? बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

एक दिवस अचानक “फुलपाखरू” या मालिकेत ज्युनिअर शाहरूख ही भूमिका मिळाली. त्यानंतर मला पुन्हा उत्साह वाटू लागला. “अस्मिता”, “क्राइम पेट्रोल” अशा अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. आता मला “क्लब 52” या चित्रपटात मला महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हा चित्रपट माझ्यासाठी मोठा ब्रेक आहे,’ अशी भावना भरतने व्यक्त केली.

महेश गायकवाड यांचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन या सिनेमाला लाभले आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या ‘क्लब 52’ या सिनेमाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून सिनेमाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाबद्दल चाहत्यांना देखील अधिक उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज