Shyamchi Aai: प्रत्येक आई अशीच असते का? बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Shyamchi Aai Trailer Out: साने गुरुजी म्हणलं की, ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai ) या पुस्तकाची सर्वानाच आठवण येते. आता याच आई आणि मुलाच्या अशा दृढ नात्याची अनोखी प्रेमाची गोष्ट रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर आधारित ‘श्यामची आई’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (Social media) नुकताच या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
या ट्रेलरमध्ये सानेगुरुजी आणि इंग्रज यांच्यामधील अनोखी अशी चकमक, सानेगुरुजींची अटक, आणि त्यांचे हाल यावर आधारित लिहायला घेतलेलं एक पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’. या सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला आपल्या मुलाला पोहता यावं तो भित्रा बनू नये, याकरिता त्याला विहिरीत ढकलणारी आई, तर अभ्यास केला नाही म्हणून त्याला ओरडा ओरड करणारी आई तसेच दुसऱ्याचं पुस्तक आणून त्यातून अभ्यास करायला लावणारी, फुलांच्या कळ्या तोडून आणल्या म्हणून त्याला शिक्षा करणारी आई या सिनेमात बघायला मिळणार आहे.
या मराठी सिनेमात स्वातंत्र्य लढ्याचा काळ देखील चाहत्यांना बघायला मिळणार आहे. त्याची एक झलक देखील ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. ‘श्यामची आई’ हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात राहणार आहे. या मराठी सिनेमात अभिनेत्री गौरी देशपांडे श्यामच्या आईची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता ओम भुतकर हा साने गुरुजींच्या म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांच्या मुख्य भूमिकेत चाहत्यांना मनोरंजन करताना दिसणार आहे. येत्या १० नोव्हेंबर दिवशी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
होऊ दे धुरळा! दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचं अनोख रेकॉर्ड; Leo’ने परदेशात रचला इतिहास
‘श्यामची आई’ या सिनेमाचे दिग्दर्शन ‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ यांसारखे प्रवाहापेक्षा अनोखा सिनेमा बनवणारा तरुण दिग्दर्शकाची धुरा सुजय डहाके यांनी सांभाळली आहे. या सिनेमात बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, सारंग साठ्ये, मयूर मोरे, उर्मिला जगताप, भूषण विकास, सुनिल अभ्यंकर, अक्षया गुरव अशी मोठी स्टारकास्ट मनोरंजन करताना बघायला मिळणार आहे.
‘श्यामची आई’ या सिनेमाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. तर सुपरहिट ‘पावनखिंड’ सिनेमाचे निर्माते भाऊसाहेब अजय -अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता असणार आहेत. तर या सिनेमाची संहिता सुप्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची असल्याची माहिती समोर आली आहे.