Nirdhar Film Shooting Completed In Kolhapur : समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाचे (Nirdhar Film)
चित्रीकरण नुकतेच कोल्हापूरमध्ये पूर्ण करण्यात आले. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध रिअल लोकेशन्सवर ‘निर्धार’चे चित्रीकरण करण्यात आले. निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालंय. लवकरच सिनेमा (Marathi Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
जेपी, एडविना, आइंस्टाइनना लिहिलेली नेहरूंची पत्रे परत करा; PM म्यूजियमचं राहुल गांधींना पत्र
जयलक्ष्मी क्रिएशन या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिलीप भोपळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केलं (Entertainment News) आहे. भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करत समाजापुढे नवा आदर्श ठेवणाऱ्या तरुण पिढीची कथा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे भ्रष्ट समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील ज्वलंत मुद्द्यावर भाष्य करण्याचा, किंबहुना तो कसा नष्ट होईल हे सांगण्याचा प्रयत्न ‘निर्धार’ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांनी फार सुंदररित्या केला आहे.
‘निर्धार’मध्ये डॅा. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, महेंद्र पाटील, कोमल रणदिवे आदी कलाकार अभिनय करत आहेत.
कला दिग्दर्शनाचं काम विकी बिडकर पाहात असून, डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अतुल शिधये रंगभूषा करत असून, प्रशांत पारकर यांनी वेशभूषाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर असून क्रिएटिव्ह प्रोड्यूसर महेंद्र पाटील आहेत. संतोष जाधव सहदिग्दर्शक असून राहुल पाटील प्रमुख सहाय्य्क दिग्दर्शक आहेत. निर्मिती व्यवस्थापक कैलास भालेराव असून अजय खाडे लाईन प्रोड्युसर आहेत.