जेपी, एडविना, आइंस्टाइनना लिहिलेली नेहरूंची पत्रे परत करा; PM म्यूजियमचं राहुल गांधींना पत्र
Rahul Gandhi : प्रधानमंत्री संग्रहालय आणि पु्स्तकालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) एक पत्र लिहीले आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित महत्वाच्या कागदपत्रांचे ५१ डबे परत करा असे या पत्रात कादरी यांनी नमूद केले आहे. ही कागदपत्रे सध्या सोनिया गांधी यांच्याकडे (Sonia Gandhi) आहेत तेव्हा ही कागदपत्रे परत करा अशी मागणी कादरी यांनी केली आहे.
कादरी यांनी म्हटले आहे की युपीए सरकारच्या काळात नेहरू यांनी लिहिलेली वैयक्तिक पत्रे सोनिया गांधी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. पंडित नेहरू यांनी ही पत्रे एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइंस्टिन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजया लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत यांना लिहिली होती. रिजवान कादरी यांनी १० डिसेंबरलाच राहुल गांधींना पत्र पाठवले आहे. याआधी त्यांनी सोनिया गांधींना देखील पत्र पाठवले होते.
राहुल गांधींची मागणी योग्यच, अदानींना अटक करा, नरेंद्र मोदींवर नाना पटोलेंचा हल्लाबोल
पीएमएमएलनुसार ही सर्व कागदपत्रे अतिशय महत्वाची आहेत. त्यामुळे ही कागदपत्रे मिळायला हवीत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही पत्रे १९७१ मध्ये नेहरू मेमोरियल म्यूजिकल अँड लायब्ररीला (पीएमएमएल) दिले होते. आता राहुल गांधींना सांगण्यात आले आहे की सोनिया गांधी यांच्याकडून मूळ पत्र घेऊन द्या किंवा ते शक्य नसेल तर त्या पत्रांची डिजिटल प्रत द्या.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी पीएमएमएल सोसायटीचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. ४ नोव्हेंरलाच कार्यकाळ संपणार होता. सोसायटीचे उपाध्यक्ष राजनाथ सिंह आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सितारमण, अनुराग ठाकूर यांच्यासारखे केंद्रीय मंत्री या सोसायटीचे सदस्य आहेत. १५ जून २०२३ रोजी एनएमएमएल सोसायटीच्या एका बैठकीत नेहरू मेमोरियल म्युजियम अँड लायब्ररीचे नाव बदलून प्रधानमंत्री म्युजियम अँड लायब्ररी सोसायटी असे ठेवण्यात आले होते.
संसदेत सावरकर, हिंदुत्व अन् राहुल गांधी, महाराष्ट्रात MVA मध्ये फुटीची स्क्रिप्ट रेडी ?