Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : ‘का रे दुरावा’ (Ka Re Durava ) या सिरीयलमुळे घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) लग्नगाठ गुपचूप बांधली आहे. सुरुचीने मराठमोळा अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade ) याच्याशी लग्नबंधनात अडकली आहे. (Wedding ) तिने स्वत: सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
सुरुची अडारकरने नुकतीच सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. यामध्ये तिने तिच्या लग्नाचे काही खास फोटो पोस्ट शेअर केले आहेत. या फोटोत सुरुची ही नववधूच्या रुपात बघायला मिळत आहे. तर मराठमोळा अभिनेता पियुष रानडे हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करत असताना दिसत आहे.
सुरुचीने हा फोटो पोस्ट करत असताना “आनंदाचा दिवस” असे कॅप्शन दिले आहे. सोबतच तिने PSILoveYou असा हॅशटॅगही देखील शेअर केला आहे. त्या दोघांच्या या फोटोवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहे.
सुरुची अडारकरने 2006 मध्ये मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. ‘पेहचान’ या सीरियलमध्ये प्रथमता ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा असं आहे’ या सीरियलमध्ये आपली अभिनयाची भूमिका बजावली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या सिरीयलमुळे तिला खरी ओळख मिळाली आहे. त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या सीरियलमध्ये झळकली होती. सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या सीरियलमध्ये दिसत आहे.
Khushi Kapoor चा आई श्रीदेवीला अनोखा ट्रीब्युट; अर्चिजच्या प्रीमिअरला परिधान केला ‘तो’ ड्रेस
तर दुसरीकडे पियुष रानडे हा देखील सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता आहे. पियुष हा सध्या ‘काव्यांजली’ या सीरियलमध्ये विश्वजीतच्या हटक्या भूमिकेत मनोरंजन करताना दिसत आहे. याअगोदर तो ‘अंजली झेप स्वप्नांची’ या सीरियलमध्ये अभिनयाची भूमिका बजावली आहे. पियुष रानडे हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढत आहे. याअगोदर तो अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्नगाठ बांधला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.