Download App

Maximus Nagar Rising मॅरेथॉनसाठी अवघे 2 दिवस बाकी, नगरकरांसोबत शिवरायांचा छावा अन् काव्यांजलीचे कलाकारही धावणार

Maximus Nagar Rising : मॅक्सिमस नगर रायझिंग ( Maximus Nagar Rising) हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा अहमदनगर शहरामध्ये (Ahmednagar) नगर रायझिंग फाउंडेशन यांच्याकडून दरवर्षी आयोजित केली जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेची यावर्षीची खासियत म्हणजे यावर्षी या स्पर्धेत शिवरायांचा छावा चित्रपटातील आणि काव्यांजली-सखी सावली या मालिकेतील कलाकार देखील धावणार आहेत.

Raghav Chadha: परिणीती चोप्राने गायलेलं गाणं ऐकून राघव चढ्ढाही थक्क; म्हणाला…

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच 4 फेब्रुवारी 2024 ला या स्पर्धेचं आयोजन केले जात आहे. ही स्पर्धा तीन कॅटेगिरी मध्ये घेतली जाते. ज्यामध्ये चार किलोमीटर मॅरेथॉन, दहा किलोमीटर मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर मॅरेथॉन हे प्रकार आहेत. या स्पर्धेची यावर्षीची खासियत म्हणजे यावर्षी या स्पर्धेत सेलिब्रिटी देखील धावणार आहेत. यामध्ये शिवरायांचा छावा मराठी चित्रपटाचे कलाकार भूषण पाटील आणि तृप्ती तोरडमल त्याचबरोबर काव्यांजली- सखी सावली या मालिकेतील कलाकार पियुष रानडे आणि कश्मीरा कुलकर्णी देखील सहभागी होणार आहेत.

स्पर्धेसाठी काही नियम…

तसेच या स्पर्धेसाठी काही नियम देखील घालून दिलेले आहेत. ज्यामध्ये मॅरेथॉन 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी, 10K श्रेणीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही किमान 16 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. 21K श्रेणीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही 18 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. 4K श्रेणीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन 2024 इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे. कोणत्याही दुखापती किंवा अपघातासाठी आयोजक समिती किंवा त्यातील कोणत्याही सदस्यांना किंवा संस्थांना जबाबदार धरले जाणार नाही.

अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी 35 वेळा पॉलिसी, 26 वेळा भारत अन् 42 वेळा उच्चारलं मोदी

तसेच या स्पर्धेदरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन देखील केलं जात. स्वयंसेवकांकडून धावपटूंना मदत आणि आवश्यक गोष्टींचं वाटप केलं जात. या उपक्रमातील यावर्षी असलेला एक उपक्रम म्हणजे बूमटाउन आयोजित कॅप पेंटिंग स्पर्धा. यामध्ये तुम्ही तुमची कल्पकता दाखवा आणि टॉप 3 विजेत्यांमध्ये येत 5000 रुपयांची बक्षिसे जिंका. तसेच स्पर्धेसाठी लागणारा टी-शर्ट आणि इतर किट देखील स्पर्धकांना दिले जाते.

follow us