Download App

चित्रपटसृष्टीसाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या मिलन लुथरियांच्या ‘कच्चे धागे’चा रौप्य महोत्सव

Image Credit: letsupp

Kachche Dhaage Movie : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या मिलन लुथरियांच्या ‘कच्चे धागे’ (Kachche Dhaage Movie) चा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला आहे. कच्चे धागे चित्रपटाचे निर्माते मिलन लुथरिया यांनाही चित्रपटसृष्टीत आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे कच्चे धागे चित्रपट आणि मिलन लुथरियांच्या प्रवासाची 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.

भाजपसोबत युती करणार का? प्रश्न विचारताच राज म्हणाले माझा विषय वेगळाय….

‘कच्चे धागे’ चित्रपटाची अप्रतिम कथा, मनमोहक अदाकारीचे सीन्स, आकर्षक सादरीकरण आणि आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खान जोडी झळकली होती. या जोडीमुळे कच्चे धागे चित्रपटाला प्रेक्षकांनी भलतीच पसंत दिल्याचं पाहायला मिळालं होतं.

जरांगेंवर गुन्हा दाखल करा; खानदान मिटवू टाकण्याची भाषा शोभते का? तायवाडेंचा हल्लाबोल

चित्रपटसृष्टीतील कच्चे धागे चित्रपटाच्या प्रवासावर नजर मारल्यास हा प्रवास उल्लेखनीय आणि कमालीचा असल्याचं पाहायला मिळतं. चित्रपटाबद्दल बोलताना मिलन लुथरिया म्हणाले, अविश्वसनीय चित्रपटसृष्टीतील २५ वर्षांच्या प्रवासाची कमालीची गोष्ट आहे. मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. ‘कच्चे धागे’ आणि माझ्या सर्व चित्रपटांना जगभरातील प्रेक्षकांकडून मिळालेला पाठिंबा कमालीचा आहे. हा एक अविस्मरणीय अनुभवांनी भरलेला एक विलक्षण प्रवास असल्याचं लुथरिया यांनी स्पष्ट केलं आहे.

Supriya Sule : माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर कुठेही बसून चर्चा करेल; सुप्रिया सुळेंचं आव्हान

दरम्यान, चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांपैकी कच्चे धागे चित्रपटाची एक प्रतिष्ठित चित्रपट म्हणून ओळख आहे. आकर्षक कथानक आणि दमदार कामगिरीसाठी हा चित्रपट प्रसिद्ध असून अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्यातील डायनॅमिक केमिस्ट्री या चित्रपटाच्या माध्यमातूनच प्रेक्षकांनी अनुभवली होती.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज