भाजपसोबत युती करणार का? प्रश्न विचारताच राज म्हणाले माझा विषय वेगळाय….

  • Written By: Published:
भाजपसोबत युती करणार का? प्रश्न विचारताच राज म्हणाले माझा विषय वेगळाय….

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. आज भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. या भेटीमुळं भाजप (BJP) आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र, भाजपसोबतच्या युतीवर बोलणं टाळलं.

Bhakshak च्या यशानंतर भूमीला हॉलिवूडचे वेध! लवकरच लॉस एंजेलिसला जाणार 

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र सोबत येतील, मनसे महायुतीत सामील होईल, अशा चर्चा सुरू आहेत. याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर सागर बंगल्यावर जाऊन आले होते. आणि आज राज ठाकरे व आशिष शेलार यांची भेट झाली. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याच भेटीसंदर्भात आणि भाजपसोबत युती करणार का, असा सवाल राज ठाकरेंना विचारला. त्यावर जास्त बोलणं ठाकरेंना टाळलं. ते म्हणाले, माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळी निवडणुकीवर बोलायचं असेल, त्यावेळी मी निवडणुकीवर बोलेनं, असं ते म्हणाले

उगाच डिमांड नाही…; 500 जणांचा लवजमा असलेल्या भाजपची सुळेंकडून चिरफाड 

यावेळी राज ठाकरे निवडणुक आयोगावर चांगलेच संतापले. शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी कैफियत त्यांनी मांडली. ते म्हणाले की, पहिली ते चौथीच्या शिक्षणांना निवडणुकीच्या कामसाठी निवडणूक आयोगाने बोलावून घेतलं. मुंबईतील 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढले आहेत. मग शाळेतील मुलांना शिकवणार कोण? याची कोणतीही व्यवस्था नाही. पाच वर्षे निवडणूक आयोग काय करतो? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही? पाच वर्षे निवडणूक आयोग काय करत होता? दर पाच वर्षांनी निवडणुका येतात, हे ठाऊक असंत ना… मग तुमची यंत्रणा तयार नाही का? प्रत्येक वेळी नवं काही तरी आणायचं आणि वाद ओढवून घ्यायचा. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक आले आहेत. पण यात विद्यार्थ्यांचा काय दोष? शिक्षकांनी कुठेही रुजू होऊ नये. विद्यार्थी घडवणे हे त्यांचे काम आहे, निवडणुकीची तयारी करणे हे त्यांचे काम नाही. शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई कोण करते हे मला पहायचे आहे. निवडणुक आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करावी, असंही ठाकरे म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube