जरांगेंवर गुन्हा दाखल करा; खानदान मिटवू टाकण्याची भाषा शोभते का? तायवाडेंचा हल्लाबोल

  • Written By: Published:
जरांगेंवर गुन्हा दाखल करा; खानदान मिटवू टाकण्याची भाषा शोभते का? तायवाडेंचा हल्लाबोल

Babanrao Taiwade on Manoj Jarange : मराठा समाजाला वेगळं आरक्षण (Maratha Reservation) मिळत असलं तरी सगेसोयऱ्यांचा कायदा होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका मनोज जरांग (Manoj Jarange) यांनी घेतली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. दरम्यान, काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आम्हाला जे विरोध करतील, त्यांना टपकून टाकू किंवा त्यांची वंशावळ राहणार नाही, असा इशारा दिला. यावर आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी भाष्य केलं. खानदान मिटवण्याची भाषा जरांगेंना शोभते का? पोलिसांनी मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी तायवाडे यांनी केली.

Lok Sabha Election : ‘ममता, नितीशची वेगळी वाट, केजरीवालही तयारीत’; ‘इंडिया’कडं राहिलं काय? 

बबनराव तायवाडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, त्यांना जरांगे पाटलांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता तायवाडे म्हणाले की, पोलिसांनी मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. कारण, मनोज जरांगेंची पत्रकार परिषद धमकीवजा होती. आम्हाला जे विरोध करतील, त्यांना टपकून टाकू किंवा त्यांची वंशावळ राहणार नाही, असं ते म्हणाले. ही कसली भाषा आहे? हीच आहे का आपल्या महाराष्ट्राची सभ्यता? कालच्या त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. खानदान मिटवून टाकण्याची भाषा ते करतात. टपकून टाकू असं ते म्हणाले. त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता. त्यामुळं मी सरकारला आणि पोलिसांना विनंती करतो की, अशी भाषा वापरणाऱ्या माणसाच्या विकोझाच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. ते सामुहिकरित्या धमकी देत आहेत, असं तायवाडे म्हणाले.

Ind vs Eng : भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; जैस्वाल, रवींद्र जडेजा ठरले ‘हिरो’ 

छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे आणि आम्ही सर्वजण आपल्या समाजाच्या घटनात्मक हक्कांचे रक्षण करण्यासाठी आमच्या समाजासोबत आहोत. जसे ते आपल्या समाजासाठी लढत आहेत, तसेच आम्ही आमच्या समाजासाठी लढत आहोत. हा गुन्हा नाही. परंतु, आमची खानदान, वंशावळ संपवण्याची भाषा ते जर करत असतील तर सरकाराने यावर त्वरित अॅक्शन घ्यावी. अन्यथा संपूर्ण ओबीसी त्यांच्या विरोधात उभा राहील, असा इशारा तायवाडे यांनी दिला.

…तर ओबीसी एकत्र येऊन विरोध करेल
ते पुढे म्हणाले, “राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा जातीच्या स्थितीबद्दलचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आता राज्य सरकार 20 आणि 21 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवणार आहे आणि त्याआधारे आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहे. परंतु ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये, यासाठी आम्ही लक्ष ठेवून आहोत. ओबीसी, एससी आणि एसटीला ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिल्यास आमचा विरोध कधीच होणार नाही. मात्र, ज्या दिवशी सरकार या ५० टक्क्यांमधून आरक्षण देण्याचा विचार करेल, तेव्हा महाराष्ट्रातील एससी, एसटी, ओबीसी एकत्र येऊन याचा विरोध करेल, असं तायवाडे म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube