‘सर्किट’ मध्ये मिलिंद शिंदेंचा खलनायकी अंदाज

Circuit: मराठी मालिका आणि चित्रपटातून अनेक चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) कायम वेगवेगळे पात्र साकारताना दिसतात. त्यांनी साकारलेलं अनेक पात्र ते जिवंत करतात. त्यांची नजर आणि संवाद बोलण्याची शैली यामुळे ते सर्वांना खूपच हटके वाटतात, आणि ते सगळ्यांपासून काहीतरी हटके बनवत असतात. आता असच एक वेगळंच रूप चाहत्यांना बघायला मिळणार […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T111636.260

Circuit

Circuit: मराठी मालिका आणि चित्रपटातून अनेक चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) कायम वेगवेगळे पात्र साकारताना दिसतात. त्यांनी साकारलेलं अनेक पात्र ते जिवंत करतात. त्यांची नजर आणि संवाद बोलण्याची शैली यामुळे ते सर्वांना खूपच हटके वाटतात, आणि ते सगळ्यांपासून काहीतरी हटके बनवत असतात. आता असच एक वेगळंच रूप चाहत्यांना बघायला मिळणार आहे.


मिलिंद शिंदे लवकरच अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tattvadis) आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Rita Durgule) यांच्याबरोबर नवीनच स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांचा ‘सर्किट’ (Circuit) हा चित्रपट येत्या ७ एप्रिल दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटामध्ये मिलिंद यांचा एक हटके अवतार सर्वांना बघायला मिळणार आहे, ते या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहेत. मात्र या खलनायकाला एकही संवाद देण्यात आला नाही.

मिलिंद शिंदे यांनी त्यांच्या अनेक भूमिकांमधून अभिनयाचे दर्शन घडवले आहे. परंतु हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीकला एका अनोखा चित्रपट असणार आहे. कारण या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला कोणत्याही प्रकारचा संवाद नाही. केवळ शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावर असलेले हावभावांच्या जोरावर त्यांनी या भूमिकेत अभिनयाचे रंग चाहत्यांना दर्शवले आहे. आपले डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव यावर त्यांनी चित्रपटात आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.

Adipurush च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक भोवणार? ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

खरं तर हा चित्रपट त्यांच्याकरिता एक मोठं आव्हान ठरला आहे. मात्र हे पात्र देखील त्यांनी एक हेतू ठेऊन साकारले आहे. या भूमिकेला त्यांनी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. शक्यतो या चित्रपटात खलनायकाच्या तोंडी कधीही न ऐकलेले खटकेबाज डायलॉग ऐकायला आणि बघायला मिळतात. मात्र इथे चित्र जरा वेगळे असल्याचे दिसणार आहे.

मिलिंद यांनी चित्रपटात काहीही न बोलता आपली मोठी छाप पाडण्याचे काम केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून त्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. ‘सर्किट’ चित्रपटाच्या टीजर आणि ट्रेलरमधून चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मिलिंद यांचा एकाही संवादाविना साकारलेला खलनायक ७ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

Exit mobile version