Asaduddin Owaisi : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा काल चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. सिनेमाच्या कथानकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत आहे. गेल्या वर्षभरापासून ज्या सिनेमाची चर्चा सुरु होती, तो ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर त्यातील दाव्यांवरून राजकीय वर्तुळामध्ये आरोप केले जात आहेत.
तसेच द केरला स्टोरीमधील दावे चुकीचे असल्याचा दावा देखील काही लोक करत असतानाचा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) या सिनेमातील दाव्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. या सर्व मुद्द्यांवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हिटलरच्या राजवटीशी देखील केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते मोदी?
कर्नाटकमधील एका प्रचारसभेत बोलत असताना मोदींनी द केरला स्टोरीचे समर्थन केले आहे. केरला स्टोरी फक्त एकाच राज्यात झालेला दहशतवादी कारवायांवर आधारित आहे. तसेच केरळमधील दहशतवादी कारस्थानाचा मोठा खुलासा द केरला स्टोरी सिनेमात करण्यात आला आहे. खरं तर देशाचे दुर्भाग्य हे आहे की, काँग्रेस आज समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीबरोबर उभी असल्याचे दिसून येत आहे, असे नरेंद्र मोदी सभेत बोलत असताना म्हणाले होते.
तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय
मोदींची हिटरलशी तुलना!
दरम्यान मोदींच्या या भूमिकेला विरोध करताना ओवैसींनी थेट हिटलरच्या राजवटीचा उल्लेख करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हिटलरने ७० लाख ज्यू लोकांना ठार मारले आहे. गॅस चेंबरमध्ये टाकले, जेलमध्ये टाकले, हे सगळं कुठून सुरू झाले आहे? आपल्याला इतिहासामधून शिकायला हवे. अगोदर हिटलरने द्वेषपूर्ण भाषणांपासून सुरुवात केली होती.
यानंतर हा सिनेमा बनवायला सुरुवात करण्यात आली. १९४० मध्ये पहिला सिनेमा तयार झाला इटर्नल ज्यू. त्यातून जर्मन लोकांमध्ये ज्यूविषयी द्वेष निर्माण केला आहे. यानंतर ज्यूंचे शिरकाण सुरू झाले, असे ओवैसी टीव्ही ९ शी बोलताना म्हणाले आहेत. पंतप्रधान नेमकं कोणत्या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक, स्क्रिप्टरायटर आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत? ते कधीपासून सिनेमांचे प्रमोशन करायला लागले आहेत?
‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत
पंतप्रधान मोदी हे खूप मोठे अभिनेते आहेत हे माहिती आहे. ते बॉलिवुडमध्ये अभिनय करत आहेत, तर फिल्मफेअर पुरस्कार त्यांनाच मिळाले असते. आता आजकाल ते सिनेमांचे प्रमोशन देखील करत आहेत, अशा खोचक शब्दात ओवैसींनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. हिटलरने ज्यूंविषयी जे केलं, ते भारत देशात होऊ नये,हा सिनेमा असत्यावर आधारित आहे.
या अगोदर निर्माते म्हणाले की, ३२ हजार मुलींचे धर्मांतरण झाले आहे. हे निर्लज्ज लोक आहेत, जे मुसलमानांना दाखवून त्यांचे पोट भरत आहेत. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना. त्यांनी सत्य दाखवावं. मुस्लीम समाजात सर्व धार्मिक संघटनांनी आयसिसचा निषेध करण्यात आला आहे. त्यांनी सांगावं की हा सिनेमा फिक्शन आहे. मग काही हरकत नाही. यांचे सर्वात मोठे प्रमोटर देशाचे पंतप्रधानच आहेत. इतिहासापासून देशाने मोठा धडा घेतला पाहिजे. हिटरलने ज्यूंच्या विषयी जे केले आहे, ते इथे आपल्या देशामध्ये होऊ नये, अशी भीती ओवैसींनी यावेळी व्यक्त केली.