Vijay Patkar : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची ( all india marathi film corporation) निवडणूक होतेय. या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) विरुद्ध मेघराज भोसले (Meghraj Rajebhosale) यांच्यामध्ये लढत होत आहे. त्यात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता. मात्र राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, असा आरोप विजय पाटकर यांनी केला. तसेच ते म्हणाले की , एका मंत्र्यांचा ओएसडी मागच्या चार दिवसांपासून कोल्हापूरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणत आहे. त्यांच्या वतीने हा व्यक्ती नको, तो व्यक्ती नको सांगतोय. मोठा दबाव आणला जात आहे. मला कळत नाही त्या मंत्र्याला आणि ओएसडी यांची विधानभवनातील सगळी कामे संपली आहेत का ? असा संपप्त सवाल पाटकरांनी उपस्थित केलाय.
अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) यांनी 2014 ते 2026 या काळात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी पॅनेल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यावेळची मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता मात्र राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, अशी खंत अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केलीय.
श्रेयस अय्यरला पुन्हा धक्का; सूर्यकुमारनंतर ‘हा’ खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार
विजय पाटकर यांचा मेघराज राजेभोसलेंवर आक्षेप
पाटकर म्हणाले, माझा आक्षेप मेघराज राजेभोसले याच्यावर आहे. त्याला लाज वाटायला पाहिजे मागील 10 वर्ष काय केलं. महामंडळाच अक्षरशः थडग केलं या माणसाने. सात महिने कर्मचाऱ्यांचा पगार देखील दिले नाहीत. उलट मला फोन करतोय आणि म्हणतोय माझा पॅनलमधून उभे रहा. याला लाज कशी वाटत नाही. मी काय माती खाल्ली आहे का? याच्या पॅनलमधून उभा राहायला, असंही पाटणकरांनी म्हटले आहे.
निलम शिर्के या अध्यक्षा होती असतील तर होऊ दे
मागील 40 वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं ? निलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होऊदे, पहिल्यांदा अध्यक्ष होईल. ती माझी मैत्रीण आहे. मी पॅनेल उभा करेल म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही, असेही विजय पाटकर यांनी म्हटलं आहे. मी पॅनेल उभा करेल म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही. राजकीय कारणामुळे मला अर्ज भरू दिला गेला नाही. माझ्यासोबत क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांनाही सुद्धा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही. पण एका मंत्र्यांचा ओसडी या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केला. त्यांनी मात्र मंत्र्यांचे नाव घेतलेले नाही. या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या अभिनेत्री निलम शिर्के या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आहेत.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बॉम्बस्फोट; 24 ठार, 50 हून अधिक जखमी
निवडणूक कार्यक्रम कसा आहे ?
उद्या सोमवारी 25 मे रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी अर्जाची छाननी होणार आहे. तर 26 ते 28 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. 29 मे रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. तर 7 जून रोजी कोल्हापूर, मुंबई, पुणे येथे मतदान होईल. तर 8 जून मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
