श्रेयस अय्यरला पुन्हा धक्का; सूर्यकुमारनंतर ‘हा’ खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार

Suryakumar Yadav :  आयपीएल 2026 नंतर भारतीय संघ टी20 मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघाला

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav :  आयपीएल 2026 नंतर भारतीय संघ टी20 मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघाला टी20 क्रिकेटमध्ये नवीन कर्णधार मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोराने सुरु आहे. तर काही मीडिया रिपोर्टनुसार, सुर्यकुमार यादवनंतर श्रेयस अय्यर भारतीय संघाचा नवा कर्णधार होणार आहे. श्रेयस अय्यर कर्णधार पदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे मात्र आता असा दावा करण्यात येत आहे की, टी20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भारतीय संघाचा कर्णधार होणार नाही.

‘PTI’ या वृत्तसंस्थेच्या एका अहवालानुसार, बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने सांगितले की, टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचे भवितव्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या हातात आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सुरुवातीला निवडकर्त्यांना असे वाटले होते की, आयपीएलमुळे सूर्यकुमार (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा फॉर्मात येणार मात्र तसं काही झालं नाही. सूर्यकुमार आयपीएल 2026 मध्ये पूर्ण फ्लॉप ठरला आहे. त्यामूळे त्याची संघात एक फलंदाज म्हणून जागा बसत नाही. त्यामुळे बीसीसीआय नवीन कर्णधारावर विचार करत आहे.

संभाव्य कर्णधारांच्या नावांमध्ये श्रेयस अय्यर हा एक प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र आता अशी देखील चर्चा आहे की, श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार होणार नाही. त्याच्या जागी बीसीसीआय शुभमन गिल (Shubman Gill) आणि तिलक वर्माच्या (Tilak Varma) नावाचा विचार करत आहे.  शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ यशस्वीरित्या ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचला आहे. गिलने फलंदाजीमध्येही अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. अगरकर आणि त्यांच्या संघाने सुरुवातीला गिलला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून पाहण्याची योजना आखली होती मात्र टी20 विश्वचषकाच्या तोंडावर त्याच्या कामगिरीत झालेली घसरण पाहाता असं झालं नाही. तर आता  सूर्यकुमारला संघाबाहेर बसावे लागले, तर गिलचे टी20 संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बॉम्बस्फोट; 24 ठार, 50 हून अधिक जखमी-

तिलक वर्माचे एक असे नाव जे सध्याच्या चर्चांमध्ये हळूहळू आपले स्थान निर्माण करत आहे. काही अहवालांनुसार जर कर्णधारपद सूर्याच्या हातून निसटले, तर तिलक देखील भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो.  त्याची नुकतंच श्रीलंकेत होणाऱ्या त्रिकोणीय ‘A’ मालिकेसाठी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

follow us