पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बॉम्बस्फोट; 24 ठार, 50 हून अधिक जखमी

Balochistan Bomb Blast : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात 24 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर

Balochistan Bomb Blast

Balochistan Bomb Blast : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात 24 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. क्वेटा येथील चमन गेट रेल्वे स्थानकाजवळून लष्करी जवानांना घेऊन जाणाऱ्या एका रेल्वेला टार्गेट करण्यात आले. या स्फोटात 24 लोकांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट (Balochistan Bomb Blast) रेल्वे रुळांजवळ झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याच्या तीव्रतेमुळे जवळच पार्क केलेली किमान 10 वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

एका अहवालानुसार, या स्फोटात किमान 24 लोकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना क्वेटा येथील ‘सिव्हिल हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोट इतका तीव्र होता की, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर धुराचे लोटच्या लोट आकाशात उठले. ही दुर्घटना क्वेटाच्या ‘मान गेट’ परिसरात घडली जिथे ‘कँटोन्मेंट’ भागातून येणाऱ्या रेल्वेला या स्फोटाचा फटका बसला. घटनेनंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख (Chief of Army Staff), जनरल आसिम मुनीर (Asim Munir) यांनी क्वेटाचा दौरा केला होता. त्यांनी अशांत असलेल्या बलुचिस्तान प्रांतात तैनात असलेल्या लष्करी तुकड्यांमधील अधिकारी आणि जवानांशी संवाद साधला.

‘GOD’ नावाचा नंबर अन् मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद चॅट्स; NEET प्रकरणात खरा ‘गॉडफादर’ कोण ?

पाकिस्तान लष्कराने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, जनरल मुनीर यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान क्वेटा येथील ‘कमांड अँड स्टाफ कॉलेज’मधील विद्यार्थी अधिकारी आणि प्राध्यापकांनाही संबोधित केले. या निवेदनानुसार, जनरल मुनीर यांनी बलुचिस्तानमध्ये तैनात असलेल्या अधिकारी आणि जवानांशी संवाद साधला आणि तेथील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

follow us