Not Allowed Pakistani Actor Film Abir Gulal Release In India : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Pakistani Actor) आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात (Abir Gulal Movie) आले. या नरसंहारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झालेत.
आरती एस बागडी दिग्दर्शित या चित्रपटात खानच्या कास्टिंगमुळे वाद (Pahalgam Terror Attack) निर्माण झाला होता. पहागम दहशतवादी हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी चित्रपट अबीर गुलालला खूप विरोध झाला आहे. सोशल मीडियावर लोक चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. आता सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा चित्रपट आता भारतात प्रदर्शित होणार नाही.
The movie ‘Abir Gulal’, starring Pakistani actor Fawad Khan, will not be allowed to release in India: Sources pic.twitter.com/V58K3IG8eS
— IANS (@ians_india) April 24, 2025
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही फवाद खानच्या चित्रपटाला विरोध केला होता. अबीर गुलालपूर्वी फवाद खान कपूर अँड सन्स, ए दिल है मुश्किल, खूबसूरत सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी (Entertainment News) घालण्यात आली. पहलगाम हल्ल्यानंतर जनतेच्या संतापामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतीय चित्रपट उद्योगाच्या पाकिस्तानी कलाकारांसोबतच्या सततच्या सहकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
जरी मुंबई उच्च न्यायालयाने 2023 मध्ये भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली असली तरी, अनेक राजकीय पक्ष आणि चित्रपट संघटना अशा सहकार्यांना ठामपणे विरोध करत आहेत. या रोमँटिक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले, तर अनेकांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली.
20 एप्रिल रोजी दुबईमध्ये गाण्याच्या लाँचसाठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी झाल्यानंतर वाणी आणि फवाद दोघांनाही कडक शब्दांत विरोध झाला. पहलगाम घटनेनंतर लगेचच खानने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या क्रूरतेचा निषेध केला. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यांनी एका निवेदनात असंही म्हटलंय की, ‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. या चित्रपटात वाणी कपूर, सोनी राजदान आणि रिद्धी डोगरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.