CM Eknath Shinde Marathi Play : प्रसाद ओक (Prasad Oak) मुख्य भूमिकेत असलेला ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा सिनेमा प्रचंड गाजला. 2022 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित होता. ‘धर्मवीर’ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली होती. ‘धर्मवीर’ नंतर ‘धर्मवीर 2’च्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची गणित बदलताना दिसणार आहे आणि आता हेच राजकारण रंगभूमीवरही रंगणार असल्याचं बघायला मिळणार आहे.
म्हणजेच रंगभूमीवर लवकरच महाराष्ट्राचं राजकारण आता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता कोणता नवा अंक मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. कारण CM एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आधारित ‘मला काहीतरी सांगायचंय’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, त्यामुळे सध्या सर्वत्र याच नाटकाची जोरदार चर्चा रंगली आहे. CM एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत या नाटकामध्ये अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) पाहायला मिळणार आहे. येत्या 2 दिवसांत या नाटकाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
मात्र सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हे नाटक एकपात्री असल्याने यामध्ये CM शिंदे नेमकं काय सांगणार याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागून राहिली. दरम्यान सध्या आणखी एका नाटकाच्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. ’50 खोके एकदम ओक्के ‘असं हे पोस्ट आहे. दरम्यान पुढे या पोस्टरवर काय ते रस्ते, काय ते खड्डे, तरीपण म्हणायचं एकदम ओक्के, असं कॅप्शनमध्ये लिहल्याचे दिसत आहे. तसेच कलाकारांच्या नावाच्या इथेही, ‘सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणारे..’ असा आशय लिहिण्यात आला आहे.
Dharmaveer 2 : ‘धर्मवीर 3’ मध्ये काय असेल? प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला- ‘लोकांना वाटतं…’
यामुळे गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेली शिंदे गट आणि ठाकरे गटाची लढाई आता मराठी रंगभूमीवर पाहायला मिळणार का? अशी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. गेल्या अडीच वर्षांत घडलेल्या घडामोडींनंतर राज्यात विधानभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने निवडणुकीची सध्या सर्वत्र जोरदार तयारी सुरू केली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मात्र या नाटकाची घोषणा झाल्यामुळे या नाटकात नक्की काय पाहायला मिळणार, याबाबातही सर्वांची उत्सुकता वाढू लागली आहे. विशेष म्हणजे धर्मवीर-2 सिनेमाही येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून आणि नाटकातून नेमकं काय पाहायला मिळणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.