मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड! प्रसाद ओकने गाठला 100 चित्रपटांचा टप्पा

मायबाप रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाने मी आज शंभरावा चित्रपट करू शकलो - प्रसाद ओक !

Prasad Oak Completd 100 Films

Prasad Oak Completd 100 Films in Marathi Cinema : आताच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत शंभर चित्रपट करणं, हे थोड कठीण. पण ही गोष्ट साध्य करून प्रत्येक भूमिकेला न्याय देऊन सातत्यपूर्ण वैविध्यपूर्ण कलाकृती करून प्रेक्षकांच मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक! पहिला चित्रपट ते आता चित्रपटाची शंभरी त्यांनी गाठली. हा प्रवास अखंड सुरू ठेवत कायम वेगवेगळ्या कलाकृती करून प्रसाद ने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे.

मोठा पल्ला गाठला

‘अष्टरूपा वैभवी लक्ष्मी माता’ ते आज ‘वडापाव’ हा प्रवास खरतर खूप खडतर असून ही प्रसादने हा एक मोठा पल्ला (Marathi Cinema) गाठला आहे. वडापाव हा चित्रपट अभिनेता म्हणून प्रसादचा (Prasad Oak) हा शंभरावा चित्रपट असला तरी या सगळ्या प्रवासात कैक भूमिका साकारल्या. मग त्यात अभिनयाच्या सोबतीने दिग्दर्शन, निमिर्ती, लेखन, गीतकार, अश्या अनेक भूमिका त्याने साकारून कायम प्रेक्षकांची मने (Entertainment News) जिंकली आहेत.

सिनेसृष्टीत दर्जेदार कामगिरी

प्रसादने मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीत दर्जेदार कामगिरी केली. अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं. त्याने सिनेमातही आपली छाप सोडली आहे. आज तो शतकी मैलाचा दगड गाठतो आहे. या प्रवासाबद्दल बोलताना प्रसाद म्हणतो, माझ्यासाठी शंभर चित्रपटाचा प्रवास अनुभव हा अत्यंत रोमांचककारी आहे. या सगळ्या चित्रपटातील भूमिका मला खूप काही शिकवून जाणाऱ्या आहेत. 100 चित्रपटात काम करताना आपण ज्यांना गुरु मानतो, अश्या अनेक दिग्गज कलाकार अशोक सराफ, मोहन जोशी, विक्रम गोखले यांच्यासोबत काही निवडक चित्रपटात काम करता आलं.

मागे वळून बघताना…

या सगळ्या प्रवासात मला एकदा अभिनेते मोहन जोशींनी सांगितलं होत तू हिरो करतोस, व्हिलन करतोस, तु गेस्ट अॅपरन्स करतोस, कॉमेडी करतोस, मालिका करतोस तुझी बहुआयामी आहेस. पण ही कारकिर्दीची एक बाजू दुसरी बाजू ही एक निर्माता किंवा दिग्दर्शक तुला किती प्रोजेक्ट्समध्ये पुन्हा पुन्हा घेतो? यावर यश अवलंबून असतं. यातून तू किती उत्तम अभिनेता आहे, हे समजतं. हे वाक्य माझ्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण ठरलं. आज 100 चित्रपटाचा आढावा घेताना मागे वळून बघताना मी तपासतो की, मला किती निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी पुन्हा काम करण्याची संधी दिली. यातून उत्तम प्रोजेक्ट्स घडले.

मनःपूर्वक आभार!

यासाठी मी खूप समाधानी आहे. माझ्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल सुर्वे तिथपासून माझ्या शतकी चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणजे मी स्वतः प्रसाद ओक. आजवर ज्यांनी मला या सगळ्या 100 चित्रपटांत काम करण्याची संधी दिली, असे सगळे निर्माते दिग्दर्शक यांचा मी कायम ऋणी आहे. 28 वर्षाच्या प्रवासात प्रत्येक माध्यमातून मला रसिक प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे मी आज शंभर चित्रपटाच्या पल्ला गाठला आहे. चित्रपट, रंगभूमी, मालिका, गाणं, दिग्दर्शन अश्या माझ्या प्रत्येक कलाकृतीवर आज प्रेक्षकांनी प्रेम केलं पाठिंबा दिला आणि म्हणून हा प्रवास मी करू शकलो. म्हणूनच रसिक प्रेक्षकांचे मी माझ्या 100 व्या चित्रपटाच्या निमित्ताने ‘मनःपूर्वक आभार’ मानतो. चित्रपटाची शंभरी पूर्ण करून प्रसादचा प्रवास हा इथेच न थांबता तो अजून पुढे उत्कंठावर्धक प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसणार असल्याचं कळतंय.

follow us