Operation Ganga : मोहनलाल स्टारर ‘ऑपरेशन गंगा’मध्ये दिसणार लष्करी कारवाईचा अस्सल अंदाज

Operation Ganga : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या आगामी ‘ऑपरेशन गंगा’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Operation Ganga

Operation Ganga

Operation Ganga : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या आगामी ‘ऑपरेशन गंगा’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या रेस्क्यू मिशन्सपैकी एका मोहिमेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विष्णू मोहन करत आहेत. श्री गोकुलम मूव्हीजच्या बॅनरखाली गोकुलम गोपालन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाची कथा 2022 मध्ये झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू असून, प्रोजेक्टला अधिक भव्य आणि वास्तववादी स्वरूप देण्यासाठी निर्माते प्रतिभावान टीमला सोबत घेऊन काम करत आहेत. चित्रपटातील लष्करी कारवाई अधिक अस्सल वाटावी यासाठी स्क्वाड्रन लीडर वर्लिन पंवार या मिलिट्री ॲडव्हायझर म्हणून प्रोजेक्टशी जोडल्या गेल्या आहेत. कॉम्बॅट मॅन्युव्हर्स आणि लष्करी सीक्वेन्सेसमधील त्यांचा अनुभव आणि कौशल्य चित्रपटाला अधिक वास्तववादी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यांच्या सहभागामुळे चित्रपटातील ॲक्शन आणि रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये अधिक वास्तवता पाहायला मिळणार असून, हाय-स्टेक्स रेस्क्यू मिशनवर आधारित या कथेला त्यामुळे आणखी बळ मिळणार आहे.

2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना मोठ्या संख्येने भारतीय नागरिक, विशेषतः विद्यार्थी, युक्रेनमध्ये अडकले होते. तसेच तेथे वास्तव्यास असलेले काही भारतीय नागरिकही या युद्धामुळे अडचणीत सापडले होते. त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी ही रेस्क्यू मोहीम राबवण्यात आली होती. ‘ऑपरेशन गंगा’ ही याच महत्त्वपूर्ण मोहिमेची कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. परदेशी भूमीवर भारताने यशस्वीपणे पार पाडलेल्या या महत्त्वपूर्ण रेस्क्यू मिशनची कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

या प्रोजेक्टचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामागे असलेली प्रतिभावान फिल्ममेकिंग टीम. चित्रपटाच्या टेक्निकल क्रूमध्ये ‘पुष्पा 1’ आणि ‘पुष्पा 2’साठी प्रसिद्ध असलेले सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोजेक यांचा समावेश आहे. तसेच ‘गोट’, ‘मेयाझगन’, ‘अमरन’ आणि ‘कथनार’ यांसारख्या चित्रपटांवर काम केलेले राजीवन हे प्रोडक्शन डिझायनर म्हणून या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत. चित्रपटातील ॲक्शनला वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी ॲक्शन डायरेक्टर सी यंग ओह काम करत आहेत. त्यांनी ‘धुरंधर’ आणि ‘किल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील ॲक्शनचे दिग्दर्शन केले आहे.

‘ऑपरेशन गंगा’ची निर्मिती श्री गोकुलम मूव्हीजच्या बॅनरखाली गोकुलम गोपालन करत आहेत. चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत दिसणार असून, अर्जुन रामपाल, भाग्यश्री बोर्से, आदिल हुसैन आणि पार्थिबन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. सुपरहिट पॅन-इंडियन चित्रपट ‘धुरंधर’च्या दमदार संगीतासाठी ओळखले जाणारे संगीतकार शाश्वत सचदेव आता ‘ऑपरेशन गंगा’साठी संगीतबद्ध करत आहेत.

तब्बल 11 कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त; राज्यात FDA ची सर्वात मोठी कारवाई-

चित्रपटाच्या क्रूमध्ये एडिटर शमीर मोहम्मद, ‘धुरंधर’, ‘उरी’, ‘3 इडियट्स’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे साउंड डिझायनर बिश्वदीप चटर्जी, ‘कांतारा’साठी प्रसिद्ध असलेले VFX सुपरवायझर के. व्ही. संजीत तसेच ‘सफेद सागर’, ‘बॉर्डर 2’ आणि ‘फायटर’ यांसारख्या प्रोजेक्ट्सशी संबंधित मिलिट्री ॲडव्हायझर स्क्वाड्रन लीडर वर्लिन पंवार यांचाही समावेश आहे. कॉस्च्युम डायरेक्टर मेल्वी जे, मेकअप आर्टिस्ट रोनेक्स झेवियर आणि प्रोडक्शन कंट्रोलर रिन्नी दिवाकर हे देखील या टीमचा भाग आहेत. चित्रपटाचे प्रोडक्शन गोकुलम गोपालन करत असून, बैजू गोपालन आणि व्ही. सी. प्रवीण हे को-प्रोड्यूसर्स म्हणून, तर कृष्णमूर्ती हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत.

Exit mobile version