तब्बल 11 कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त; राज्यात FDA ची सर्वात मोठी कारवाई
Tukaram Mundhe : अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यात एफडीएने मोठी कारवाई करत तब्बल 11 कोटींची बेकायदेशीर
Tukaram Mundhe : अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यात एफडीएने मोठी कारवाई करत तब्बल 11 कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त केली आहे. जून ते ऑगस्ट 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत एफडीएने 607 उत्पादन आस्थापना आणि 2295 विक्री आस्थापनांची तपासणी करत 880 परवानाधारकांवर कारवाई केली आहे. तर 203 आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले असून 11 कोटींपेक्षा जास्त किंमतीची बेकायदेशीर औषधं जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.
एफडीएकडून (FDA) देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात जून ते ऑगस्ट 2026 दरम्यान एफडीएने शोध व जप्ती च्या 104 कारवाया केल्या.यात मुदतबाह्य औषधांची विक्री, फ्रीजशिवाय ठेवलेल्या संवेदनशील लसी आणि बनावट नोंदी असे गंभीर प्रकार उघडीस आल्याने या कारवाईत 11.41 कोटी रुपये तिमतीची बेकायदेशीर औषधे आणि सौंदर्यप्रसाधनां वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच 20 एफआयआर दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे.
सक्षम तांत्रिक कर्मचाऱ्याऐवजी मंजुरी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून उत्पादनाच्या नोंदी ठेवल्या जात होत्या. क्वालिटी कंट्रोल विभागात योग्य तांत्रिक व्यक्ती नसतानाच चाचण्या केल्या जात होत्या. तसेच प्रत्यक्ष उत्पादनाचा माल आणि कागदोपत्री नोंदवलेले वजन यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याची देखील माहिती माध्यमांना एफडीएकडून देण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कठोर कार्यवाही होणार – तुकाराम मुंढे
या कारवायाबद्दल बोलताना अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) म्हणाले की, नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व नियमबद्ध औषधे उपलब्ध करुन देणे ही अन्न व औषधे प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. औषधांच्या उत्पादनापासून ते अंतिम विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर प्रभावी नियामक देखरेख ठेवण्यासाठी तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात येत आहे.
तुम्ही फक्त उद्घाटनं करत बसा; काम मात्र आम्ही करणार…आमदार सत्यजीत तांबेंचा विरोधकांना टोला
नियमांचे पालन करणार्या आस्थापनांना सहकार्य करतानाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कायद्यानुसार कठोर आणि परिणामकारक कार्यवाही सातत्याने करण्यात येणार आहे असं अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.