TMKOC: तारक मेहताची कलाकार मोनिकाचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाली, ‘माझ्यावर खूप…’

TMKOC: लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC ) सध्या खूप जास्त चर्चेत येत आहे. या मालिकेत रोशन भाभी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनेफेरने या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर त्यातील अनेक कलाकारांनी निर्मात्या विरोधात आपलं स्पष्ट मत व्यक्त करायला सुरुवात केले आहे. (TMKOC Controversy) […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 27T183850.178

TMKOC

TMKOC: लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC ) सध्या खूप जास्त चर्चेत येत आहे. या मालिकेत रोशन भाभी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनेफेरने या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर त्यातील अनेक कलाकारांनी निर्मात्या विरोधात आपलं स्पष्ट मत व्यक्त करायला सुरुवात केले आहे. (TMKOC Controversy) त्यामुळे असित कुमार मोदींच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. जेनिफर नंतर या मालिकेत बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियाने मोठा गौप्यस्फोट केला आहे.


मोनिकाने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणून बबिताजी ही मालिका का सोडली या. तिने सांगितलं की मुनमुन दत्ताने ही मालिका सोडण्या मागचं कारण आता समोर आले आहे, तिचा छळ करण्यात आला होता. छेडछाड केल्यावर लोक कामावर येणं बंद केले, आणि नंतर त्यांना फोन करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून केला जात होता. मोनिकाने पुढे सांगितलं की, मुनमुन आणि असित मोदी यांच्यात खूप वाद व्हायचे आणि वादामुळे मुनमुनने अनेकवेळा मालिकेचे चित्रीकरण अर्ध्यावरच सोडलं आहे.

निर्माते असित मोदी यांच्या वागण्याबाबत मोनिकाने आणखीन एक खुलासा केला आहे. त्यावेळी मोनिका ने सांगितलं की, असित मोदी हे महिलां कलाकारांना महत्त्व देत नाहीत. तर असित हा पुरुष कलाकारांचं चित्रीकरण आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो व त्यांना महिला कलाकारांपेक्षा जास्त पैसे देतो. महिला आणि पुरुष कलाकारांचं दोघांचंही काम सारखंच असून सुद्धा महिलांना कमी पैसे दिले जातात आणि त्यांचा गैरफायदा सुद्धा घेतला जातो. मोनिकाने पुढे असेही सांगितलं की, असित मोदी हा इतकी वाईट भाषा वापरतो की मी स्वतः सुद्धा सांगू शकत नाही.

Kiran Mane Post: किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘तू पाटलीण…’

असित मोदींवर आरोप
गेल्या काही दिवसाअगोदर मोनिका भदौरिया यांनी स्वत:हून शो सोडला होता, आणि असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. 2019 मध्ये त्यांनी हा शो सोडला होता. या वर्षी त्यांना 3 महिन्यांचे पैसेही मिळाले नव्हते. मोनिका यांच्या आईचे निधन झाले होते, तेव्हा त्यांना एका आठवड्यामध्येच सेटवर परत बोलवण्यात आले होते.

त्यातून त्यांना असंही सांगण्यात आले होते की, तुला आम्ही पैसे देत आहोत, तेव्हा आम्ही तुला कधी देखील बोलवून घेऊ शकतो. सोबतच अभिनेत्री प्रिया अहूजा यांनी देखील निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांना 9 महिने शोमध्ये बोलवले नव्हते. निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्यावर पैसे देखील थकवल्याबद्दल आरोप करण्यात येत आहेत.

Exit mobile version