Download App

Moses Singh; … म्हणून यो यो हनी सिंग माझ्यासाठी फेमस’, दिग्दर्शकांनी थेटच सांगितलं

Moses Singh On Yo Yo Honey Singh: चित्रपट निर्माते मोजेझ सिंग (Moses Singh) यांच्या आगामी डॉक्युमेंटरी फीचर ‘यो यो हनी सिंग: फेमस’ (Yo Yo Honey Singh) याची घोषणा झाल्यापासून त्याची जोरदार चर्चा आहेत (Social media) आणि ही फीचर फिल्म मोझेझसाठी देखील तितकीच खास आहे, कारण त्याने पहिल्यांदाच डॉक्युमेंटरीसाठी (Documentary) काम केलं आहे.

तो याबद्दल सांगताना म्हणाला की, “माझ्यासाठी डॉक्युमेंटरी हे संपूर्ण नवीन जग होते. चित्रपट निर्मितीची एक संपूर्ण नवी बाजू या निमित्तानं अनुभवता आली. विविध पैलू उलगडत ही फीचर फिल्म केली असून माझा हा अनुभव कमालीचा होता. ‘यो यो हनी सिंग’: फेमस’ खास आहे, कारण ती माझ्यासाठी पहिली डॉक्युमेंटरी आहे. काम करताना अनेक नवनवीन गोष्टी शिकणं तितकच खास आहे.

‘यो यो हनी सिंग: फेमस’ ही भारतातील सर्वात लोकप्रिय रॅपर यो यो हनी सिंगच्या स्टारडमचा प्रवास उलगडणारी डॉक्युमेंटरी आहे. याआधी या डॉक्युमेंटरी फीचरबद्दल बोलताना हनी सिंगने स्पष्टपणे सांगितले होते. यो यो हनी सिंगला प्रत्येकजण ओळखत असेल पण या डॉक्युमेंटरी फिल्मद्वारे त्यांना हिरदेश सिंग कोण आहे हे कळणार आहे. यो यो हनी सिंग ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर येणार आहे.

‘संघर्षयोद्धा’- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं रिलीज

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांनी भारतीय रॅपर आणि हिप हॉप कलाकार यो-यो हनी सिंगच्या जीवनावर आधारित फीचर फिल्मवरील मुख्य शूट पूर्ण केलं आहे. शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी स्टारर ह्यूमन ही सुपर यशस्वी वेब सिरीज तयार केल्यानंतर या दिग्दर्शकाने त्याच्या दूरदृष्टीने या प्रोजेक्टचे शूट पूर्ण केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज