Download App

Sonu Sood: सोनू सूद ठरला ‘मोस्ट स्टायलिश उद्योजक’

Sonu Sood: सोनू सूद (Sonu Sood) हा एक अष्टपैलू अभिनेता तर आहे, पण मनोरंजन आणि व्यवसाय ब्रिजिंग स्टार-स्टडेड इव्हेंटमध्ये मोस्ट स्टायलिश उद्योजक पुरस्कार त्याने पटकावला आहे. कोरोना काळात (COVID19) त्याने लोकांना केलेली मदत उल्लेखनीय ठरली.


पुरस्कार सोहळ्यात सोनू सूदने आत्मविश्वास घेरून प्रेक्षकांची कायम मन जिंकली. (Social media) कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट होताच सोनू सूदचा विजय हा केवळ स्टाईलचा उत्सव नव्हता, हे सगळ्यांना कळून आल्याचे बघायला मिळत आहे. सोनू सूदचा मोस्ट स्टायलिश उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे.

सोनू सूद यांचा जन्म सन ३० मे १९७३ साली पंजाब राज्यातील मोगा या छोट्याशा शहरात झाला. सुरुवातीला त्यांनी मुंबईला चित्रपट इंडस्ट्रीजमध्ये काम मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आलं नाही. सोनू सूद यांनी त्यांच्या जीवनात केलेला पहिला चित्रपट हा तमिळ भाषिक होता.

सोनू सूद सुरुवातीला त्यांना हिंदी चित्रपट क्षेत्रांत काम मिळालं नाही. सोनू सूद यांनी तमिळ, तेलगु, कन्नड आणि हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यावेळी दक्षिण भारतीय चित्रपट क्षेत्रांत सोनू सूद एक सुपरस्टार म्हणून ओळखला जात असतो.

Video: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर अशोकमामा झाले भावुक; नेमकं काय घडलं? पाहा…

सोनू सूद यांनी भारतीय लोकांची मने आपल्या अभिनयातून तर जिंकत आला आहे. तसेच देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी कोविड १९ या महामारी प्रसंगी देशांतील मजूर वर्गाला त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनाची तसचं, त्यांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था करून आपली एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी केलेली कामगिरी खरच खूप मोठी आहे. संपूर्ण जग महामारीचा सामना करत असताना गरिबांच्या सेवेसाठी धावून येणारे एक देवदूतच म्हणवे लागतील. तसचं, देशातील युवकांसाठी ते एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व बनला आहे.

Tags

follow us