मौनी रॉयचा संसार मोडला ! लग्नाच्या चार वर्षांतच सूरज नंबियारसोबत घटस्फोट

Mouni Roy- दोन दिवसांपूर्वी मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नंबियार यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते.

Mouni Roy

Mouni Roy

Mouni Roy divorce with Suraj Nambiar: बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयचा (
Mouni Roy ) सुखी संसार तुटला आहे. चार वर्षांपूर्वी दुबईतील व्यावसायिक सूरज नंबियारसोबत ( Suraj Nambiar) ती विवाहबद्ध झाली होती. आता तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत पतीपासून विभक्त झाल्याचे जाहीर केले आहे. या पोस्टमध्ये सूरज नंबियारसोबतचा विवाह संपुष्टात आणण्याचे कारण तिने सांगितले आहे.

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग याची कान्सच्या रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री! पाहा त्याची खास झलक…

दोन दिवसांपूर्वी मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नंबियार यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते. ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीतरी बिनसल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता मौनी रॉयने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक निवेदन जारी केले. कमेंट सेक्शन काढून टाकून तिच्या चार वर्षांच्या वैवाहिक जीवनातील दुराव्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

अनेक लोकांनी आमच्या वैयक्तिक आयुष्याला सनसनाटी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या अफवा व बनावट गोष्टी पसरविल्या आहेत. ज्या आमच्या नात्याचे खरे स्वरूप दर्शवत नाहीत. आमच्या वैयक्तिक प्राधान्यक्रमांचा विचार करता, आम्ही पूर्ण सामंजस्य आणि आदराने, परस्पर संमतीने आमच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. सध्या आम्ही हे प्रकरण गोपनीयतेने कसे हाताळायचे यावर लक्ष केंद्रित करत आहोत. भविष्यात आमची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.


हरियाणवी धग आता मराठी मातीत उतरणार, ‘मार तू शिक्का’ गाण्यात सपना चौधरीचा भन्नाट डान्स

अभिनेत्रीने तिच्या निवेदनात पुढे लिहिले, आम्ही तुमच्या समजुतीची प्रशंसा करतो. तुमच्या गोपनीयतेबद्दल आणि समर्थनाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. अलीकडेच असा दावा करण्यात आला होता की मौनी रॉय आणि सूरज नंबियार सहा महिन्यांपूर्वी वेगळे झाले आहेत. तथापि, या जोडप्याचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. त्यांच्या विभक्त होण्यामागे अनेक कारणे सोशल मीडियावर समोर आली आहेत.

Exit mobile version