Akshaya Naik : …म्हणून काम मागायला लाज वाटत नाही – अक्षया नाईक
Akshaya Naik : हिंदी टीव्ही विश्वातून पदार्पण करून पुढे मराठी टीव्ही, ओटीटी मधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी आणि घरघरात पोहचलेली अभिनेत्री
Akshaya Naik : हिंदी टीव्ही विश्वातून पदार्पण करून पुढे मराठी टीव्ही, ओटीटी मधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी आणि घरघरात पोहचलेली अभिनेत्री अक्षया नाईक सुंदरा मना मध्ये भरली सारखा सुपरहीट टीव्ही शो असो ते नेटफ्लिक्स सारख्या बड्या ओटीटी वर जगभर गाजलेली तस्करी वेब सीरीज आजवर तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांना मोहीत केलं आहे.
सध्या अक्षया (Akshaya Naik) एका वेगळ्या कारणानं चर्चेत आहे ते म्हणजे इंडस्ट्रीत काम कसं मिळणारं या बद्दल तिने एक विशेष स्टेटमेंट दिलं असून सध्या कलाकारांना काम मिळण्याबाबत तिने काही खास गोष्टी उघड केल्या आहेत.
या बद्दल बोलताना ती म्हणते मला काम मागायला लाज वाटत नाही. एक्टिंग हे करियर जितकं ग्लॅमरस आहे तितकंच अनसर्टेन देखील आहे. प्रायोगिक कलाकृतींमधून कधी कधी पैसे मिळत नाही. सोशल मीडियावर मी बरीच सक्रिय असते वेगवेगळ्या गोष्टी करून बघते. अनेक जणांना वाटत त्यामुळे की मी फार व्यस्त आहे पण म्हणतात ना कलात्मक कामाने घरातले बिल आणि इएमआय थोडीच भरले जाणार आहेत.
बऱ्याचदा प्रोजेक्ट लेट होतात. सुरू झालेले बंद होतात. अनेकवेळा पैसे अडकले जातात. काम हातात असून नसल्यासारखं होऊन जातं माझ्या शरीरयष्टीमुळे आजही मला लिमिटेड स्कोप आहे असं मला वाटतं किंवा मला योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये. त्यामुळे शेवटी हा पर्याय निवडला. कॉर्पोरेट वाले नोकरी (naukri.com, linkedin ) सारखे ऍप वापरून काम शोधतच अस्तात की आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय गेल्या काही वर्षात सोशल मीडिया प्रेझेन्स हा कलाकार लोकासाठी किती फायदेशीर ठरलाय.
एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? महासचिव विनोद तावडेंनी घेतली भेट-
ही पोस्ट करण्यामागे महत्त्वाचा उद्देश हा आहे की माझ्यात चांगलं काम करण्याची क्षमता आहे, त्यासाठी मेहनत घेण्याची इच्छा देखील आहे. फक्त संधी हवी आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचायचं” कलाकार म्हणून काम मागण्याची लाज न बाळगता पुढे येऊन काम शोधण्याच धाडस सध्या अक्षया करताना बघायला मिळते.