Download App

Video : … आता मात्र भीती वाटायला लागलीये; सैफवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेचं विधान चर्चेत

Supriya Sule On Saif Ali Khan :  बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काल रात्री 3.30 च्या सुमारास चाकूने हल्ला

  • Written By: Last Updated:

Supriya Sule On Saif Ali Khan :  बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काल रात्री 3.30 च्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून आता विरोधक चारही बाजूने सरकारवर टीका करत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील या प्रकरणात चौकशी करून ज्याप्रमाणे सरकारने संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली आहे. त्याप्रमाणे सैफ अली खानच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्या. अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली. महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढत आहे. मुंबईच्या कमिशनरशी बोलले आहे. या प्रकरणानंतर खान कुटुंब घाबरलेल आहे. कुटुंब घाबरणाच साहजिकच आहे. मुंबईमध्ये खूप मोकळ जगायची सर्वांनाच सवय असल्याने सर्वांकडेच खूप मोठी सिक्युरिटी यंत्रणा नसते.  हा माणूस कुठून आला याबाबत क्लॅरिटी येत नाही. बीड असेल परभणी असेल किंवा आता बांद्रामध्ये झालेली घटना असेल यातून गुन्हेगारी वाढलेली वाढलेली दिसत आहे.

पोलीस कमिशनर म्हणाले याची नोंद घेतली आहे. कुटुंबाच्या सुरक्षतेबाबत सरकारने गांभीर्याने घ्यावं मी मागणी केलेली आहे सरकारशी देखील बोलली आहे. बीड आणि परभणीला जशी सिक्युरिटी दिली आहे तशी या कुटुंबाला देखील तातडीने दिली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी वेळी केली.

पुढे माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही अस्वस्थ करणारी घटना आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात राज्यात अश्या खूप घटना झाल्या आहेत. सलमान खानच्या घरावरील हल्ला असो किंवा आता बांद्रात घडलेली घटना असो. आम्ही रात्री अपरात्री फिरत असतो ती कोणाला काळजी पण नसते त्यांना वाटतं महाराष्ट्रात फिरत आहेत काही अडचण नाही पण आता काळजी वाटायला लागली आहे.

मोठी बातमी ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारकडून मंजुरी

बीड मधील घटना परभणीची घटना आणि आत्ताची घटना राजकीय विषयच नाही हा सामाजिक विषय आहे. हा गुन्हेगारीचा विषय आहे. यात कसलं आलाय राजकारण या गोष्टी सिनेमात होतात ते आता तुमच्या माझ्या आयुष्यात व्हायला लागले आहेत. असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

follow us