Sridhar Parthasarathy : शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातमान मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांचे पुण्यात निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील बाणेर येथे एका दिवाळी पहाट कार्यक्रमादम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं.
मृदंगवादक श्रीधर पार्थ (Sridhar Parthasarathy) यांनी बॉब बेल्डन (Bob Belden) यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील माइल्स फ्रॉम इंडिया या अल्बममध्ये योगदान दिले होते. त्यांच्या निधनानंतर शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) शोक व्यक्त केला. हे पचवणेच अशक्य आहे. माझ्यासाठी आणि संपूर्ण संगीत विश्वासाठी ही एक मोठी हानी आहे. आमचे अत्यंत लाडके श्रीधर पार्थसारथी जे सर्वोत्तम मृदंगवादकांपैकी एक आणि एक विलक्षण संगीतकार होते त्यांच्या जाण्याने आम्ही पूर्णपणे हादरलो आहोत असं शंकर महादेवन म्हणाले. सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीधर पार्थसारथी यांनी मृदंगाची साथ केली होती. अनेक मैफली, गप्पा आणि संगीताच्या आठवणी या दोघांनी एकत्र अनुभवल्या होत्या. वादन करत असतानाच श्रीधर यांनी जगाचा निरोप घेतल्याने ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे महादेवन यांनी म्हटले.
रसिक प्रेक्षकाने काय सांगितलं?शंकर महादेवन यांच्या पोस्टवर कमेंट करत कल्याणी टोकेकर नामक महिलेने हे दृश्य प्रत्यक्ष पहिल्याचा दावा केला आहे. हे प्रत्यक्ष पाहणे अत्यंत धक्कादायक होते. अवघ्या 5 मिनिटांपूर्वी ते आनंदाने मृदंग वाजवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची कोणतीही खूण नव्हती. त्यानंतर पूर्वायन यांनी घोषणा केली की, पहिल्या सत्राच्या समाप्तीला 15 मिनिटे बाकी असताना ते दोन भजने सादर करतील.
‘व्हेंटिलेटर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा कामेरकर कुटुंबाची होणार भेट-
श्रीधर यांनी एक मृदंग बाजूला ठेवून दुसरा बाहेर काढला, सर्वजण आपापली वाद्ये सज्ज करत असतानाच ते आमच्यासमोर पडले. नेमके काय घडत आहे हे कोणाला समजण्याआधीच ते पूर्णपणे कोसळले होते असं कल्याणी पोस्टच्या कमेंटमध्ये व्यक्त केल्या आहेत.
