बॉलिवूडमध्ये मराठीचा जलवा! अभिजीत सावंतची जादू, मराठमोळ्या गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मने

यंदाचा हा बॉलिवुड म्यूजिक प्रोजेक्ट लक्षवेधी आणि खास ठरला, तो गायक अभिजीत सावंत याच्या सुमधुर संगीताने.

Abhijeet Sawant Performs In Bollywood Music Project

Abhijeet Sawant performs In Bollywood Music Project : संगीतप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या बॉलिवूड म्यूजिक प्रोजेक्ट हा नुकताच दिमाखात पार पडला. अनेक दिग्गज संगीतकार, गायक हे दरवर्षी या संगीत महोत्सवाची वाट बघत असताना आणि दरवर्षी वेगवेगळ्या संगीतकार गायकांना यात गाणं सादर करण्याची संधी दिली जाते. शंकर महादेवन, फरान अख्तर, शान एशान, अनु मलिक, सलीम – सुलेमान मर्चंट, अश्या अनेक बड्या संगीतकार गायकांच्या सोबतीने अभिजीत सावंत यंदा या बॉलिवुड म्यूजिक प्रोजेक्टचा भाग झाला.

सदाबहार गाण्याने

यंदाचा हा बॉलिवुड म्यूजिक प्रोजेक्ट (Bollywood Music Project) लक्षवेधी आणि खास ठरला, तो गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) याच्या सुमधुर संगीताने आणि त्याचा सदाबहार गाण्याने. इंडियन आयडॉलपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिजीत इथे देखील प्रेक्षकांची मन जिंकून गेला. अभिजीतने 20 वर्षाच्या संगीत प्रवासातली अनेक गाणी इथे परफॉर्म (Marathi Singer) केली. हिंदी मराठी गाण्याचा सोबतीने अभिजीत ने त्याचा एव्हरग्रीन गाण्याची जादू इथे दाखवली. तरुणाईला वेड लावणरं ‘मोहब्बतें लुटाऊँगा’पासून ‘सर सुखाची श्रावणी’ अशी अभिजीत सावंतची सदाबहार गाणी त्याने (Entertainment News) बॉलिवूड म्यूजिक प्रोजेक्टमध्ये गायली.

बॉलिवुड गाण्याच्या पलिकडे

बॉलिवुड म्यूजिक प्रोजेक्टसारख्या बड्या मंचावर फक्त हिंदीत नाही, तर मराठी गाणं गाऊन त्याने अमराठी प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं. बॉलिवुड गाण्याच्या पलिकडे जाऊन आपला मराठीबाणा जपत त्याने सर सुखाची श्रावणी गात संगीतप्रेमी ना सुखाचा धक्का दिला अस म्हणणं वावगं ठरणार नाही.

या बद्दल बोलताना अभिजीत सांगतो ” हा मंच खरचं खूप मोठा आहे अगदी तरुणाई पासून लहानमुला पर्यंत प्रेक्षक इथे आम्हाला बघत असतातत्याचप्रमाणे ऐकत असतात आणि त्यांचा आवडीची गाणी ऐकवन हे आमचं फक्त कर्तव्य नसत तर त्यांना एक नॉस्टाल्जिक फील देऊन परफॉर्म करावं लागतं. जरी हा बॉलिवूड म्यूजिक प्रोजेक्ट असला तरी माझ्या फॅन्सना मराठी गाणं ऐकवण भाग आहे आणि म्हणून सर सुखाची श्रावणी ऐकून मराठी प्रेक्षकांच्या सोबतीने अमराठी लोकांनी सुद्धा या गाण्याला तेवढीच उस्फुर्त दाद दिली आणि हे बघून खूप मस्त वाटलं. कलेला भाषा नसते अस म्हणतात आणि हाच अनुभव मला इथे अनुभवयाला मिळाला. आजची तरुणाई हीप हॉप रिमिक्स डीजे म्यूजिक ऐकणारी असली तरी अश्या संगीत महोत्सवात त्यांना OG गाण्याची आवड निर्माण होऊन जाते अस मला वाटतं.

मराठी माणसासाठी अभिमानास्पद

एक मराठमोळा गायक जेव्हा अनेक दिग्गज संगीतकार गायक मंडळी सोबत एकाच मंचावर गातो तेव्हा तो क्षण मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानास्पद असतो. अभिजीत सावंत संगीत इंडस्ट्रीत 20 वर्ष पूर्ण करत असताना बॅक टू बॅक वैविध्यपूर्ण आणि तो ट्रेंडिंग गाणी करताना दिसतोय.

follow us