Salman Khan Firing Case Big Update : सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) गोळीबार प्रकरणात नवे अपडेट समोर आले आहे. (Firing Case) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये (Galaxy Apartment) झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी आता नवी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 4 शूटर्सना अटक करण्यात आला आहे. सुपरस्टारवरील हल्ल्याचा मोठा कट उघड झाला आहे. सलमानच्या या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या 4 शूटर्सना पोलिसांनी मुंबईतील पनवेल शहरातून अटक करण्यात आला आहे.
धनजय सिंग तपे सिंग उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया वास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि जीशान खान उर्फ जावेद खान अशी या चार शूटर्सची नावे आहेत. एवढेच नाही तर हे चार शूटर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असल्याचेही समोर आले आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करण्यापूर्वी चौघांनी सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊस आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची रेकी केली होती, असे समजते. पनवेलच्या फार्म हाऊसवर हल्ला करण्याची योजना त्यांनी आधी आखली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या चार शूटर्सना ‘एके 47’ सह इतर अनेक शस्त्रांनी गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमधून अनेक व्हिडिओही सापडले आहेत. याशिवाय पनवेलमध्ये सलमान खानवर हल्ल्याचा कट रचण्यासाठी पाकिस्तानी शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे मिळवण्याची योजना आखण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह 17 हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वार आरोपींनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केला. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. सलमानच्या सुरक्षेसाठी सरकारने त्याची सुरक्षा वाढवली आहे. पोलिसही याप्रकरणी कडक कारवाई करत आहेत. गोळीबार प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.