Sahil Khan: अभिनेता साहिल खान विरोधात तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

Sahil Khan: बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) मोठ्या संकटात सापडला आहे. मुंबईतल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीने साहिल खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार पोलिसात (Mumbai Police) दिली आहे. तसेच त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली असल्याचे या महिलेने तक्रारीत सांगितले आहे. यामुळे साहिल खानच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 20T170043.847

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 20T170043.847

Sahil Khan: बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) मोठ्या संकटात सापडला आहे. मुंबईतल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीने साहिल खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार पोलिसात (Mumbai Police) दिली आहे. तसेच त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली असल्याचे या महिलेने तक्रारीत सांगितले आहे. यामुळे साहिल खानच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप (Allegation) त्याच्यावर लावण्यात आले आहे. तसंच साहिल खानने पीडित महिलेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तिच्याविषयी अश्लील पोस्ट लिहिली असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

Chauk चित्रपटाचा टीझर रिलीज, पुन्हा दिसणार प्रविण तरडेंची खास शैली

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला ओशिवरा येथील रहिवासी आहे. तिने 15 एप्रिल रोजी या अभिनेत्याच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, महिलेच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये साहिल खानचे त्या महिलेसोबत पैशावरून भांडण झाले होते. त्यानंतर साहिल खानने तिच्याबरोबर गैरवर्तनच केले नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

Exit mobile version