Chauk चित्रपटाचा टीझर रिलीज, पुन्हा दिसणार प्रविण तरडेंची खास शैली

Chauk चित्रपटाचा टीझर रिलीज, पुन्हा दिसणार प्रविण तरडेंची खास शैली

Teaser Out Of Marathi movie Chauk : चौक म्हटलं की, आपल्याला आठवत ते वाहन, लाकांच्या येण्या-जाण्याची वर्दळ, वाद, भांडण किस्से, मिरवणुका आणि घटना. अशाच एका चौकाची कथा आता प्रक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया यांनी आज या चित्रपटाची पहिली झलक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली होती.

आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. काही क्षणात हा टीझर सगळीकडे व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरूवातीलाच भव्य गर्दी आणि गणेशोत्सव तसेच चौक यांचं समीकरण दाखवण्यात आलं आहे. यामध्ये मराठीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट एक पर्वणी असणार आहे.

Nitin Deshmukh : राज्य सरकार मुख्यमंत्री शिंदे नाहीतर फडणवीसच चालवतात…

‘चौक’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. या पोस्टरमध्ये, चौकात सूचना, सुविचार लिहिण्यासाठी असलेला फळा दिसतोय. दोस्ती ग्रुप, पुणे यांच्या या फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘चौक’ दिसतंय. अनुराधा प्रॉडक्शन आणि निर्माते दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) प्रस्तुत ‘चौक’ चित्रपटात महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट आहे, असा अंदाज बांधला जातोय. अद्याप या चित्रपटाच्या तारखेची घोषणा झालेली नसून हा चित्रपट नक्की कधी रिलीज होतोय, याची उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटात कोण कलाकार असतील, चौक म्हणजे नक्की कशासंदर्भात कथा असेल, याचेही तर्क बांधले जात आहेत.

‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी त्यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube