A R Rahman Wife Saira Banu Divorce : मनोरंजन सृष्टीतून मोठी बातमी समोर आलीय. ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक ए आर रहमान (A R Rahman) आणि त्यांची पत्नी सायरा बानो (Saira Banu) हे जोडपं विभक्त झालंय. त्यांच्या डिव्होर्सच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सायरा बानोच्या वकिलाने मंगळवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून हे जोडपं विभक्त झाल्याची घोषणा केली.
आज सकाळी एआर रहमानने सोशल मीडियावर (Bollywood News) 29 वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी स्वीकारली. यासोबतच त्यांची मुलगी खतिजा हिनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीय भावनिकदृष्ट्या व्यथित झाल्याचे या पोस्ट्सवरून स्पष्ट झालं (Entertainment News) आहे.
मंगळवारी सायरा बानोच्या वकिलाने सोशल मीडियावर पोस्ट केली की, ” नात्यातील अत्यंत भावनिक तणावानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे”,. यानंतर एआर रहमान यांनी स्वत: X वर या विषयावर आपली पहिली प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्याच्या पोस्टमध्ये, ए.आर. रहमान यांनी विभक्ततेमुळे उद्भवलेल्या भावनिक तणावाला प्रतिबिंबित केलंय. त्यांनी विभक्त होण्याच्या अडचणी मान्य करत दुःख व्यक्त केले. रहमानने लिहिले, “आम्ही तीस वर्षे पूर्ण करू अशी आशा होती, परंतु असं दिसतंय की सर्व गोष्टींचा अदृश्य अंत आहे.
VIDEO : परळीत मोठा राडा! मुडेंच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला केली मारहाण
ऑस्कर विजेते आणि जगप्रसिद्ध गायक एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी 29 वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी 1995 मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात बरेच दिवस सगळं काही ठीक होते, पण आता दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे सायरा बानोच्या वकिलाने या घटस्फोटामागे भावनिक तणाव असल्याचं सांगितलं जात आहे. एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाचे कारण भावनिक ताण असल्याचं बोललं जात आहे.
आशुतोष काळेंनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क
रेहमान कुटुंब या वैयक्तिक समस्येला सामोरे जात असताना गोपनीयतेची विनंती करत आहेत. विभक्त झाल्यानंतर देखील रहमान यांचे लक्ष आगामी प्रकल्पांवर आहे. ज्यात छावा, ठग लाइफ, लाहोर 1947 आणि जिनी यांचा समावेश आहे. चाहते या प्रकल्पांची आतुरतेने वाट पाहात आहे. ए.आर. रहमान आणि सायरा बानो हे रहीमा आणि खतिजा आणि मुलगा अमीन यांचे पालक आहेत.