Naal 2 : 2018 मध्ये आलेला नाळ (Naal 2) चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. जाऊ दे ना वं गाण्याच्या यशापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत या चित्रपटाने मजल मारली होती. त्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती ती नाळ 2 या चित्रपटाची त्यात नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासून चित्रपटाच्या पुढच्या भागाची कथा कशी असणार आहे. याची उत्सुकता होती.
महाविकास आघाडीत ‘वंचित’ची एन्ट्री? शरद पवार अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
त्यात या चित्रपटाचा टीझर आणि गाणं रिलीज झाल्यानंतर चैत्या मोठा झाल्याचं दिसत आहे. अभिनेता श्रीनिवास पोकळेनी लहानपणी निभावलेला चैत्या मोठा झालावरही त्यानेच साकारला आहे. तो आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आलाय. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला बघतो, पण पुढे काय होणार हे चित्रपटाच पाहायाला मिळणार आहे.
तर लहानपणी आपल्या खऱ्या आईसाठी हट्ट धरणारा चैत्या या आईला भेटल्यावर त्याच्या भावना काय असणार ही नात्यातील चढउतार त्याला झेपणार का? त्याची खऱ्या आई त्याला कशी सामोरी जाणार चैत्याला त्याची खरी आई भेटल्यावर त्याच्या या आईचं काय होणार? लहानपणी ती त्याला रोखू शकली पण आता चैत्या तीला कायमचं सोडून जाणार का? या सगळ्या गुंतागुंतीच्या भावविश्वाचा उलगडा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच होणार आहे.
‘नाळ भाग 2’च्या पहिल्या टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भिंगोरी’ गाणेही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘आई मला खेलायला जायचंय’ या गाण्याप्रमाणेच ‘भिंगोरी’ या गाण्याचे व्ह्यूजही दिवसेंदिवस वाढत आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ भाग 2’चे सुधाकर रेड्डी यंक्कट्टी दिग्दर्शक आहेत. ‘नाळ’ ने प्रेक्षकांशी नाळ जोडली. राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. आता ‘नाळ भाग 2’ लवकरच पहिल्या भागातील आठवणींचा खजिना मोठा चैतू पुन्हा उलगडणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत ही नात्यांची नाळ अधिकच घट्ट होणार आहे.