Nagraj Manjule Khashaba Movie Shooting: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे नाव अस्सल मराठी असूनही देशभरात पोचलं. फॅंड्री, सैराट अशा सिनेमामधून त्याने आपलं दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केलं. (Marathi Movie) तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ते झुंड सिनेमात बघायला मिळाले होते. याशिवाय नागराज चित्रपटातून अभिनयही करतो. यापूर्वी सायलेन्स, नाळ अशा चित्रपटातून त्याने अभिनय केला आहे. पण सुप्रसिद्ध कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातून मुख्य भुमिका कोण साकारणार याबद्दल सध्या कुठलाच खुलासा झाला नाही. परंतु खाशाबा चित्रपटाच्या शूटिंगला ( Khashaba Movie Shooting) सुरूवात झाली आहे.
सध्या नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून त्यांनी या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे, ही गोड बातमी शेअर केली आहे. ‘चांगभलं’ असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ हा सिनेमा गेल्या महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाचाही चाहत्यांना मोठी उत्सुकता लागून राहिली होती. 2018 साली ‘नाळ’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतला होता. बॉक्स ऑफिसवर देखील या सिनेमानं मोठा गल्ला कमावला होता.
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ बॉलिवूड आणि खुद्द मराठी सिनेमाशीही स्पर्धा असताना या सिनेमानं मोठा गल्ला कमावला होता. या सिनेमाला अनेक पुरस्कार देखील देण्यात आले आहेत. लहानग्या चैत्याचे भावविश्व या सिनेमातून आपल्या भेटीला आले होते. श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदार, नागराज मंजुळे, दिप्ती श्रीकांत, जितेंद्र जोशी यांचा बहारदार अभिनय या सिनेमात बघायला मिळाला होता. याअगोदर त्यांना ‘घर बंदूक बिर्यानी’ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता.
या सिनेमातून सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांची एक अनोखी भुमिका होती. हा सिनेमाही बराच काळ गाजला होता. त्यामुळे त्याची अनेक वेगवेगळ्या चर्चा देखील रंगल्या आहेत. सध्या या पोस्टखाली सर्वांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी नागराज यांना शुभेच्छा देत आहेत. आकाश ठोसरनं देखील ‘चांगभलं’ असं लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खाशाबा जाधव हे सुप्रसिद्ध कुस्तीपटू होते. त्यांची आजही तितकीच जोरदार चर्चा होत असते. 1952 साली झालेल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. हे पदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील ते पहिले खेळाडू होते.