Namit Malhotra Ramayana Launched In Delhi Mumbai : नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ (Ramayana) देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये भव्य पद्धतीने लॉन्च करण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता. 5 हजार वर्षांपूर्वीची ही कथा जगभरातील 2.5 अब्जांहून अधिक लोक श्रद्धेने (Entertainment News) मानतात. म्हणूनच रामायण ही केवळ एक गोष्ट नाही, ती एक संस्कृती, एक परंपरा आहे. ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ ची झलक देशभरातील थिएटरमध्ये दाखवण्यात आली, ज्यामुळे प्रेक्षक केवळ खूश झाले नाहीत, तर त्या अनुभवाशी (Namit Malhotra) आत्मीयतेने जोडले गेले.
उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, तर राज ठाकरेंची प्रशंसा; शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर
पहिल्यांदाच, ऑस्कर विजेते दोन दिग्गज – हान्स झिमर आणि ए. आर. रहमान एकत्र आले आहेत. एक अनोखी आणि भव्य सिने-संगीत रचना करण्यासाठी. IMAX साठी खास चित्रीत करण्यात आलेली ही रामायण अशा एका अनुभवासारखी भासते, जी प्रेक्षकांना एका गूढ आणि गहन जगात घेऊन जाते. त्यामुळे ही फक्त एक चित्रपट नाही, तर मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन कथांपैकी एकाची आत्मा अनुभवण्याची एक अद्वितीय संधी आहे.
जेव्हा निर्मात्यांनी सोशल मीडियावर थिएटर्समधील काही दृश्ये शेअर केली, जिथे प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात, आश्चर्यचकित चेहऱ्यांनी ‘रामायण’ ची झलक पाहत होते, ते दृश्य अक्षरशः अंगावर शहारा आणणारे होते. चाहत्यांनी याला “अद्भुत”, “भव्य” आणि “गूजबम्प्स देणारे” असे संबोधले. अनेकांनी तर हे देखील म्हटले की, जे अपेक्षित होते, त्यापेक्षा हे खूपच भव्य आणि जबरदस्त निघाले.
बंधू एकत्र आले हे चांगलच झालं, पण यांच्यातील नवरा अन् नवरी कोण?, नितेश राणेंचा टोला
या प्रतिक्रिया दाखवणाऱ्या झलक व्हिडिओसोबत निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दुनियाभरातून मिळणाऱ्या प्रेमासाठी मनःपूर्वक आभारी आहोत. #Ramayana: The Introduction ला जो प्रतिसाद आणि प्रेम मिळाले, ते खरोखर भावनिक करणारे आहे. आम्हा सर्व कलाकारांनी आणि टीमने मनापासून यावर काम केले आहे. आता जे येणार आहे, ते याहूनही खास असेल. #Ramayana #RamayanaByNamitMalhotra दिवाळी 2026 आणि 2027 मध्ये — संपूर्ण जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार.