उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, तर राज ठाकरेंची प्रशंसा; शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर

Shivsena Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Melava : वरळीतील एनएससीआय डोम येथे आज मनसेने (MNS) ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. ठाकरे बंधू अखेर मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखो मराठीप्रेमी, शिवसैनिक (Shiv Sena) आणि मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अखेर आता या मेळाव्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आलीय.
महाराष्ट्राच्या राजकारणाला नव वळण; ठाकरे बंधू एकत्र, पाहा विजयी मेळाव्यातील फोटो
शिवसेनेची पोस्ट
ही प्रतिक्रिया देताना शिवसेनेने राज ठाकरेंची (Politics) पाठराखण केली, तर उद्धव ठाकरे यांच्यावर मात्र जहरी टीका केलीय. राज-उद्धव एकत्र आल्यास महाराष्ट्राची राजकीय समीकरण निश्चितच बदलतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु यावर शिवसेनेने मात्र सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये राज ठाकरे यांना उजवं माप दिलं गेलंय, तर उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
“मी राज ठाकरेंचे आभार मानतो त्यांनी..”, CM फडणवीसांनी आभार मानत केला अजेंडा सेट
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक
शिवसेनेच्या पोस्टमध्ये या दोन्ही भावांतील विरोधाभास दाखवणारी नऊ वाक्य शेअर करण्यात आली आहेत. यामधून राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखविण्यात आलाय. 9 विरोधाभास दाखवणारी वाक्य शेअर करण्यात आली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
एक उजवा, दुसरा डावा
एक धाकला असून थोरला
दुसरा थोरला असून धाकला
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी
एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा
एकाचा मराठीचा वसा
दुसऱा भरतोय खिसा
एकाचा…— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 5, 2025
एक उजवा तर दुसरा डावा
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलंय की, एक प्रबोधक आहे तर दुसरा प्रक्षोभक आहे. एक उजवा तर दुसरा डावा, एक धाकला तर दुसरा थोरलो एक मराठीप्रेमी आहे, तर दुसरा खुर्चीप्रेमी आहे. एकाच्या मुखी आसूड तर दुसऱ्याच्या तोंडी सूड. एक मराठीचा पुरस्कर्ता तर दुसरा तिरस्कर्ता आहे. एक प्रगल्भ तर दुसरा वेडापिसा. एकाचा मराठीचा वसा आहे, तर दुसरा खिसा भरतोय. एकाचा स्वतंत्र सवतासुभा, तर दुसरा नुसताच आयतोबा असल्याचा निशाणा त्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.