“मी राज ठाकरेंचे आभार मानतो त्यांनी..”, CM फडणवीसांनी आभार मानत केला अजेंडा सेट

“मी राज ठाकरेंचे आभार मानतो त्यांनी..”, CM फडणवीसांनी आभार मानत केला अजेंडा सेट

Devendra Fadnavis replies Raj Thackeray : आज राज्याच्या राजकारणात एक वेगळं चित्र दिसलं. तब्बल वीस वर्षांच्या दुराव्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकाच (Uddhav Thackeray) व्यासपीठावर दिसले. मुंबईतील वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ठाकरे बंधुंनी जोरदार भाषणे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी करुन दाखवलं, असा टोला राज ठाकरे यांनी भाषणातून लगावला. राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी राज ठाकरे यांचे आभार मानतो असं फडणवीस म्हणाले आहेत.

मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद हे मलाच मिळतील. मला सांगण्यात आलं होतं की विजयी मेळावा होणार आहे. पण त्याठिकाणी रुदालीचंही भाषण झालं. मराठी भाषेबद्दल न बोलता आमचं सरकार गेलं. आमचं सरकार पाडलं आम्हाला सरकारमध्ये घ्या, आम्हालाच निवडून द्या असंच ऐकायला मिळालं. हा मराठीचा विजयोत्सव नव्हता. ही रुदाली होती.

“मी माझी चूक मान्य करतो, माफी मागतो”, मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांना उपरती

आम्ही मराठी आहोत, हिंदुत्वाचा अभिमान

फडणवीस म्हणाले, गेली 25 वर्षे त्यांच्याकडे मुंबई महापालिका होती. या 25 वर्षांत ते काहीच करू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात आम्ही मुंबईचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या काळात मात्र मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. जनतेला सर्व गोष्टी माहिती असतात. मुंबईतील मराठी माणूस असो किंवा अमराठी असोत सगळेच आमच्यासोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. त्या सोबतच आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. आमचं हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 20 वर्षांनंतर मी उद्धव एका व्यासपीठावर आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं आहे. कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्रा मोठा आहे. महाराष्ट्र आणि मराठीकडे वेड्या वाकड्या नजरेने पाहायचं नाही. सत्ता तुमच्याकडे असेल विधानभवनात पण आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महायुती सरकारला इशारा दिला.

हिंदी असणाऱ्यांना राज्य सांभाळते आले नाही. हिंदी भाषेविषयी (Hindi Language Row) मला वाईट वाटत नाही. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. अमित शहा (Amit Shah) यांना इंग्रजी येत नाही. हिंदी प्रांतात 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केले पण आम्ही मराठी लादली का? असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विचारला.

मनसे स्टाईल दणका, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube