Nana Patekar Marathi Movie: आजवर मराठीत कायम हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे सिनेमा होत आहेत. (Nana Patekar) यासाठी मराठी सिनेमासृष्टी प्रसिद्ध आहे. (Makarand Anaspure) कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी चाहत्यांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येणार आहेत. नुकताच त्यांच्या आगामी ‘ओले आले’ (Aale Aale Marathi Movie) या मराठी सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
यामध्ये नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव झळकणार आहेत आणि ते रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेत असल्याचे बघायला मिळत आहेत. या मराठी सिनेमात मकरंद अनासपुरे हे देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत. कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ मराठी सिनेमाच्या मोशन पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेली ‘एक अशा प्रवासाची रंजक गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ ही ओळ आणखी कुतूहल निर्माण करणारी आहे. हे त्रिकुट कुठे चालले आहे? या प्रवासाचं नेमकं प्रयोजन काय असणार आहे? असे काही प्रश्न उत्सुकता निर्माण करणार आहेत.
रश्मिन मजीठिया निर्मित, या सिनेमाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केले आहे. “मराठी सिनेरसिकांची आवड निवड लक्षात घेत आम्ही ‘ओले आले’ हा सिनेमा बनवला आहे. यामध्ये रंजक प्रवासाची धम्माल गोष्ट असणार आहे, ती प्रत्येकाला नक्कीच जवळची वाटणार आहे. ही सहल चाहत्यांचे खूपच मनोरंजन करणार आहे”, असा विश्वास कोकोनट मोशन पिक्चर्सचे संस्थापक रश्मिन मजीठिया यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Honey Singh Divorce: हनी सिंहचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नीने केले हिंसाचाराचे आरोप
‘ओले आले’ मराठी सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. हा सिनेमा नवीन वर्षी पहिल्या आठवड्यामध्ये 5 जानेवारी 2024 दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.