Download App

Ole Aale: नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर अन् सायली संजीव यांचा ‘ओले आले’ सिनेमाचा टीझर रिलीज

Ole Aale Teaser Released: आजवर मराठीत नेहमीच हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे सिनेमा बनत आले आहेत. कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी ‘ओले आले’ (Ole Aale) या सिनेमाचे धमाकेदार टीझर रिलीज झाले. त्यात नाना पाटेकर (Nana Patekar), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि सायली संजीव (Sayali Sanjeev) झळकत आहेत आणि ते रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. या सिनेमात मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) हे देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत.


‘नव्या वर्षात आत्मसात करूया जीवन जगण्याचा जरा हटके दृष्टीकोन! सादर आहे ‘ओले आले’चा कमाल आणि धम्माल टीझर! कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ सिनेमाच्या मोशन पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेली ‘नव्या वर्षात आत्मसात करूया जीवन जगण्याचा जरा हटके दृष्टीकोन! सादर आहे ‘ओले आले’चा कमाल आणि धम्माल टीझर! या सिनेमातील हे त्रिकुट नेमकं कुठे चालले आहे? या प्रवासाचं नेमकं प्रयोजन काय बरं असेल? असे बरेच प्रश्न उत्सुकता निर्माण करत आहेत.

रश्मिन मजीठिया निर्मित, या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केले आहे. “मराठी सिनेरसिकांची आवड निवड लक्षात घेऊन आम्ही ‘ओले आले’ हा सिनेमा बनवला आहे. यामध्ये जी प्रवासाची धम्माल गोष्ट आहे, ती प्रत्येकाला नक्कीच जवळची वाटणार आहे. ही सहल प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी असेल”, असा विश्वास कोकोनट मोशन पिक्चर्सचे संस्थापक रश्मिन मजीठिया यांनी व्यक्त केला आहे.

‘ओले आले’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करत आहेत. हा सिनेमा नवीन वर्षी पहिल्या आठवड्यात 5 जानेवारी 2024 रोजी चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Panchak Teaser Released: आता कोणाचा नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज

‘ओले आले’ या सिनेमाच्या आधी सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांचा झिम्मा-2 हा सिनेमा देखील रिलीज झाला आहे. ‘झिम्मा-2’ हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमात सुहास जोशी, रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर आणि शिवानी सुर्वे हे कलाकार देखील मुख्य भूमिका साकारली आहेत.

Tags

follow us